बोंबला! बॅण्डबाजासह वरात घेऊन नवरदेव निघाला; अर्ध्या रस्त्यात कोरोना पॉझिटिव्ह आला अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:59 PM2020-06-21T12:59:21+5:302020-06-21T13:13:56+5:30

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांना ठरलेले सभारंभ पुढे ढकलावे लागले. तर काहींनी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत, डिजीटल माध्यामांचा आधार घेत लग्न किंवा इतर समारंभ पार पाडले. आज आम्ही तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहोत. एक नवरदेव बाशिंग बांधून खटपट करत वरात घेऊन निघाला पण रस्त्यातच त्याला अडचणींचा सामना करावा लागला.

ही घटना उत्तर प्रदेशातील आहे. नवरामुलगा वरात घेऊन निघाला पण त्याच्या सासरी पोहोचू शकला नाही. अर्ध्या रस्त्यात नवरदेव आणि त्याच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. रिपोर्ट आल्या आल्या प्रशासकीय अधिकारी यांनी वरात आहे त्या जागी थांबवण्याचे आदेश दिले.

टाईम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या वृत्तानुसार हा मुलगा आणि त्याचे वडील काही दिवसांपूर्वी दिल्ली येथून उत्तरप्रदेशात आले होते. ही वरात कमरोली गावातून हैदरगढ येथे जात होती.

सोबत सजवलेल्या पाच गाड्या सुद्धा होत्या. बॅण्डबाजासह आनंदमय वातावरणात मुलाकडची मंडळी वरात घेऊन निघाली होती.

पण रस्त्यातच नवरामुलगा आणि त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच सगळेजण अचंबित झाले. पोलीसांनी जागीच त्यांना अडवलं

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांसह कुटुंबातील १० जणांना सुद्धा रुग्णालयात नेण्यात आलं. नंतर या सदस्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इतर सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार इतर सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

(image credit: IndiaShor)

Read in English