लय भारी! सोशल डिस्टेंसिंगचे धडे देणारं प्री वेडिंग फोटोशुट; पाहा जोडप्याचे भन्नाट फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 01:38 PM 2021-02-15T13:38:49+5:30 2021-02-15T13:49:38+5:30
Pre-wedding photoshoot with social distance : सोशल मीडियावर एका कपल्स प्री वेडिंग शुट भन्नाट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे व्हेलेंटाईन डे च्या दिवशी लोकांना सोशल डिस्टेंसिंगचा संदेश देण्यासाठी कपल्सने हे फोटोशूट केलं जेव्हापासून जगभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. तेव्हापासून लोकांनी कोरोनाच्या माहामारीला हलक्यात घ्यायला सुरूवात केली आहे.
जास्तीत जास्त लोक सुरक्षेच्या कारणास्तव नाही तर दंड भरावा लागू नये म्हणून मास्क वापरतात. तर सोशल डिस्टेंसिंगचीही वाईट अवस्था आहे. खूप कमी ठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलेलं दिसून येतं.
सोशल मीडियावर एका कपल्स प्री वेडिंग शुट भन्नाट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे व्हेलेंटाईन डे च्या दिवशी लोकांना सोशल डिस्टेंसिंगचा संदेश देण्यासाठी कपल्सने हे फोटोशूट केलं आहे. हे फोटो तुम्हालाही प्रचंड आवडतील.
लाल रंगाच्या ड्रेसिंगमध्ये या दोघांनी समालाजाला सोशल डिस्टेंसिंगचे महत्व पटवून दिले आहे.
हे फोटो सोशल मीडियावर @alexatheawkwardphotog ने फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आम्हाला व्हॅलेंनटाईन डे कपल्स फोटोशूट करण्यापासून सोशल डिस्टेंसिंगने रोखू शकले नाही
ही संकल्पना लोकांना खूप आवडली आहे. तुमच्या क्रियेटिव्हीटीनं आमचं मन जिंकलं आहे असं अनेकांचे म्हणणे आहे.