Prime minister narendra modi bhoomi poojan arrival of two goats ram janmabhoomi gate
पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजन करत असताना दालनाजवळ २ बकऱ्या पोहोचल्या, तेव्हा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:59 PM2020-08-05T15:59:00+5:302020-08-05T16:43:53+5:30Join usJoin usNext अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनादरम्यान कडेकोट बंदोबस्त असतानाही अनोखा प्रसंग घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमी पूजन करत होते. त्याच दरम्यान बाहेरच्या परिसरात दोन बकऱ्या आल्या आणि इकडे तिकडे फिरू लागल्या. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त असतानाही बकऱ्या आल्याच कशा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संत, महंत राममंदिराच्या निर्माणाचे भूमिपूजन करत होते. उत्तर प्रदेश पोलिस आणि एसपीचीची सुरक्षा व्यवस्था खूपच कडेकोट होती. तरीसुद्धा या परिसरात या दोन बकऱ्या अचानक आल्यानं राम जन्मभूमी दालनाजवळ खळबळ उडाली. या बकऱ्या फक्त इकडून तिकडे फिरत होत्या. सुरक्षा कर्मचारी आणि अयोध्येतील पालिका कर्मचारी बकऱ्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करत होते. परंतू अनेकदा प्रयत्न करूनही या बकऱ्या रामजन्मभूमीच्या परिसरातून जायला तयार नव्हत्या. दरम्यान अनेक दशकांपासून राम मंदिराबाबत वादविवाद सुरू होते. अखेर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर मंदिर तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या उभारणीसाठी वेळमर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानुसार २०२४च्या पूर्वी अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. टॅग्स :राम मंदिरअयोध्याउत्तर प्रदेशनरेंद्र मोदीयोगी आदित्यनाथRam MandirAyodhyaUttar PradeshNarendra Modiyogi adityanath