सगळ्यात महागडा कबूतर माहित्येय का? याच्या किंमतीत आलिशान फ्लॅट विकत घ्याल, वाचा खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 12:29 PM2020-11-16T12:29:19+5:302020-11-16T12:41:52+5:30

सामान्य दिसणाऱ्या या कबूतरांच्या किंमतीचा तुम्हाला अंदाजही नसेल. या कबूतराच्या किमतीत तुम्ही दिल्ली किंवा मुंबईत एक आलिशान घर विकत घ्याल. तुमच्या खिडकीजवळ किंवा गच्चीवर बसून गुटर गूं असा आवाज करणारे हे कबूतर नाहीत. कबूतरांच्या प्रजातीतील सगळ्यात वेगाने उडणारे हे कबूतर आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण अलिकडेच एका लिलावादरम्यान १४ कोटी रुपयांना हे कबूतर विकत घेण्यात आलं आहे.

या कबूतरानां न्यू किम या नावानं ओळखलं जातं. बेल्जियन प्रजातीचे हे कबूतर तब्बल १४ कोटी रुपयांना विकले गेले आहे. एका श्रीमंत चीनी व्यक्तीने बेल्जियमच्या पीपी पीजन सेंटरमधील लिलावातून हे कबूतर विकत घेतले आहे. हे कबूतर घेण्यासाठी दोन चीन व्यक्तींनी बोली लावली होती. आतापर्यंत या दोघांच्याही नावांचा खुलासा करण्यात आलेला नाही.

दोन्ही चीनी नागरिक लिलावाच्या वेळी आपल्या कुटूंबासह उपस्थित होते. या कबूतरांना रेसिंग आणि वेगाने उडण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते. ७६ वर्षीय गॅस्टन वान डे वुवर यांच्यासह त्यांची मुलं या कबूतरांचे पालन पोषण करून त्यांना मोठं करतात. या लिलावादरम्यान एकूण ४४५ कबूतर आले होते. या लिलावात विक्री झालेले कबूतर आणि अन्य पक्षी मिळून तब्बल ५२ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली.

न्यू किम सारखे रेसिंग कबूतर १५ वर्षांपर्यंत जीवंत राहू शकतात. अनेकजण या कबूतरांवर ऑनलाईन सट्टे लावतात. आजकाल या कबूतरांच्या माध्यमातून चीन आणि युरोपीय देशातील लोक आपली संपत्ती वाढवत आहेत.

युरोप आणि चीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यतींचे आयोजन केलं जातं. हे कबूतर जिंकल्यानंतर मिळणारे पैसै बोली लावत असलेल्या लोकामध्ये वाटले जातात. साधारणपणे ही पद्धत घोड्याच्या शर्यतीप्रमाणेच असते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेल्जियमकडे जवळपास २.५० लाखांच्या शर्यतीच्या कबूतरांची फौज होती. या कबूतरांचा वापर संदेशाची देवाण घेवाण करण्यासाठी केला जात होता. या कबूतरांशी निगडीत एक फेडरेशन तयार करण्यात आले होते. या फेडरेशनमध्ये हजारो लोकांचा समावेश होता.

जवळपास ५० वर्षांपूर्वी फ्रान्स आणि स्पेनमधील वातावरणाबद्दल माहिती देण्यासाठी कबूतरांना प्रशिक्षण दिलं जात होतं. (Image Credit- Aajtak, Economic times,indian lekhak)