Railways Facts : जग चंद्रावर पोहोचले, पण 'या' देशांमध्ये आजपर्यंत ट्रेन धावली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 04:55 PM2022-12-14T16:55:42+5:302022-12-14T17:16:53+5:30

Railways Facts : जगामध्ये आजही असे काही देश आहेत, जिथे आजपर्यंत ट्रेन धावत नाहीत.

भारतीय रेल्वे देशातील जवळपास सर्व शहरांपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच भारतातील लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानानंतर भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. वेगाने वाढणाऱ्या जगामध्ये आजही असे काही देश आहेत, जिथे आजपर्यंत ट्रेन धावत नाहीत.

दक्षिण आशियातील सर्वात लहान देश असलेल्या भूतानमध्ये आजपर्यंत रेल्वे नेटवर्क विकसित झालेले नाही. भूतान हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुंदर देश आहे. भारत भविष्यासाठी अशी योजना तयार करत आहे, ज्यामध्ये भूतान रेल्वे मार्गाने जोडला जाईल.

कुवेतमध्ये तेलाचे साठे आहेत. मात्र येथे आजतागायत एकही रेल्वे लाईन नाही. या देशात राहणारे लोक खूप श्रीमंत आहेत आणि त्यांची जीवनशैलीही हायफाय आहे. दरम्यान, कुवेतमध्ये रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच लोक कुवेतच्या ट्रेनमधून प्रवास करताना दिसतील.

अंडोराची गणना जगातील छोट्या देशांमध्येही केली जाते. कमी लोकसंख्या असलेला हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूपच लहान आहे. या देशातही आजपर्यंत रेल्वेचे नेटवर्क विकसित होऊ शकले नाही. येथील लोक सार्वजनिक वाहनांमध्ये खाजगी वाहने किंवा बसचा अधिक वापर करतात.

ईस्ट तिमोरमध्येही ट्रेनचे नेटवर्क नाही. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देशात लोक रस्त्यांवरून जास्त प्रवास करतात. दरम्यान, आता या देशात 310 किमी लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे.

सायप्रसमध्येही रेल्वे नेटवर्क नाही. 1950 ते 1951 पर्यंत येथे रेल्वेचे जाळे होते. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा ट्रॅक चालू ठेवता आला नाही. या कारणामुळे रेल्वे ट्रॅक 1951 नंतर येथे बंद करण्यात आला.