Rajasthan bharatpur kachori jalebi baboon bizzare story breakfast fruit shop
काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:31 PM2021-01-27T18:31:09+5:302021-01-27T18:38:34+5:30Join usJoin usNext राजस्थानच्या भरतपूर परिसरात एका माकडाची खूप चर्चा आहे. त्यामुळे हे माकड चर्चेत आलं आहे. हे माकड आपल्या हवं तेव्हा कचोरी आणि जिलेबीच्या दुकानात येतं आणि आपल्या हातानं नाष्ता करायला सुरूवात करतं. . इतकंच नाही तर त्यानंतर फळांच्या दुकानात जातं आणि फळ खाण्याचा आनंद घेतं. बाकीच्या अनेक वस्तू हे माकड आवडीन खातं. या ठिकाणचे दुकानदार या माकडाची वाट पाहतात. हा प्रकार चौबुर्जा परिसरातील आहे. या ठिकाणची कचोरी आणि जिलेबी सर्वत्र प्रसिद्द आहे. रोज सकाळी एक माकड त्या दुकानत येतं आणि कचोरीसह जिलेबीचा आनंद घेतं. दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार कचोरी आणि जिलेबी खाण्यासाठी ग्राहक रांग लावून उभे असतात. या माणसांच्यामध्येच येऊन माकड जिलेबी फस्त करतं. हे माकड अर्धा तास दुकानात बसतं आणि त्याला हव्या त्या पदार्थांचा आनंद घेतं. . स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या माकडानं आतापर्यंत ना कोणाला त्रास दिला ना कोणावर हल्ला चढवला आहे. पोट भरल्यानंतर हे माकड स्वतःहून परत जाते. (Image Credit- Aajtak)टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटकेSocial ViralJara hatke