Rare tortoise indian star fishing couple witchcraft drug trafficking smuggled indapur pune
मासे पकडणाऱ्या महाराष्ट्रातील जोडप्याला सापडलं चमकदार दुर्मिळ कासव; 'या' कामांसाठी केली जाते तस्करी By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 12:49 PM2020-12-06T12:49:17+5:302020-12-06T13:08:41+5:30Join usJoin usNext एका जोडप्याला उजनी धरण परिसरात मासे पकडत असताना एक दुर्मिळ कासव सापडला आहे. हा कासव ज्यावेळी या जोपड्यानं वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपावला तेव्हा त्यांना कळलं की, दुर्मिळ प्रजातीचा इंडियन स्टार कासव असून कासवांची ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या कासवाचा वापर जादू टोना आणि मंत्र तंत्रासाठीसुद्धा केला जातो. असं अनेकांचे म्हणणं आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये इंडियन स्टार या प्रजातीचा हा दुर्मीळ कासव सापडला आहे. भिगवणजवळ उजनी धरणात मासे पकडताना हा कासव मिळाला आहे. जागतिक स्तरावरील हा दुर्मीळ प्रजातीचा कासव आहे. विनोद काळे आणि त्यांची पत्नी शिवानी काळे यांना हा कासव मासेमारी करताना आढळला. इंडियन स्टार इतर सामान्य कासवांच्या तुलनेत अधिक सुंदर असतात. बाहेरच्या बाजूने या कासवाची पाठ चमकदार असते. चांदण्याप्रमाणे या कासवाच्या शरीरावर डाग असतात. हा दुर्मिळ कासव जगतील सगळ्यात मोठ्या प्रजातींपैकी एक आहे. ही प्रजाती मुख्य स्वरूपातून दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि भारतात आंध्र प्रदेश, तमिलनाडु, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे आढळते. अंधश्रद्धा, जादू-टोणा आणि नशायुक्त उत्पादनांच्या निर्मीतीसाठी या कासवांची तस्करी केली जाते. हा दुर्मिळ कासव उजनी धरणात सापडला असून या दाप्तत्यानं वन अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आहे. हे दुर्मिळ कासव उजनी धरणात सापडला असून या दाप्तत्यानं वन अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आहे.टॅग्स :जरा हटकेपुणेJara hatkePune