robot saibira will file a complaint about peoples
पोलीस ठाण्यात रोबोट तैनात! By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:49 PM2019-11-21T15:49:04+5:302019-11-21T15:58:31+5:30Join usJoin usNext विशाखापट्टनम : आंध्र प्रदेश पोलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी एक खास रोबोट विकसित केला आहे. येथील विशाखापट्टनम पोलिसांनी सायबर गुन्हा संदर्भातील प्रकरणात लोकांना त्वरित न्याय देण्यासाठी एका कृत्रिम रोबोटची नियुक्ती केली आहे. सायबिरा (CYBIRA) असे या रोबोटचे नाव आहे असून त्याला महारानीपेटा पोलीस ठाण्यात तैनात करण्यात आले आहे. सायबिरा रोबोटचे लॉन्चिग पोलीस आयुक्त आर. के. मीणा यांनी गेल्या सोमवारी केले. हा रोबोट विकसित करणारी कंपनी रोबो कॅपलर प्रायव्हेट लिमिटेडचे सदस्य डीके इरावत यांनी सांगितले की, 'रोबोट लोकांच्या तक्रारी नोंद करून घेईल आणि स्वंयचलितरित्या पोलीस विभागाकडे पाठवेल.' तसेच, या विभागाकडून या तक्रारींचा निपटारा झाला नाही, तर रोबोट उच्च प्राधिकरण किंवा उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रारी पाठवून देईल, असे डीके इरावत यांनी सांगितले. याशिवाय, अधिकाऱ्यांनी सुद्धा तक्रारींचे निराकरण करण्यास असमर्थता दाखविली तर रोबोट थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे स्वयंचलितरित्या तक्रारी पाठवणार आहे, असेही डीके इरावत यांनी सांगितले. टॅग्स :पोलिसरोबोटPoliceRobot