Roxy Sykes earns a lot of money by selling her sweaty socks and shoes
काय सांगता? दुर्गंधी सॉक्स आणि शूज विकून ती झाली कोट्याधीश! By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 04:22 PM2018-11-09T16:22:58+5:302018-11-09T16:27:29+5:30Join usJoin usNext एकीकडे काही लोक दिवसरात्र मेहनत करुनही आपल्यासाठी दोन वेळचं अन्न मिळवू शकत नाहीत. तर दुसरीकडे असेही काही लोक असतात जे मेहनत न करता केवळ डोक्याचा वापर करुन वर्षाला कोट्यवधींची कमाई करतात. बंर काही लोकांची खरेदीची क्रेझही फार विचित्र असते. ती किती याचं हे उदाहरण म्हणता येईल. बाजाराची अशीच जाण असणारी एक तरुणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही तरुणी तिचे दुर्गंधी मोजे आणि शूज ऑनलाइन विकत आहे. का तर केवळ तिचे पाय सुंदर आहेत म्हणून... एकीकडे काही लोक दिवसरात्र मेहनत करुनही आपल्यासाठी दोन वेळचं अन्न मिळवू शकत नाहीत. तर दुसरीकडे असेही काही लोक असतात जे मेहनत न करता केवळ डोक्याचा वापर करुन वर्षाला कोट्यवधींची कमाई करतात. बंर काही लोकांची खरेदीची क्रेझही फार विचित्र असते. ती किती याचं हे उदाहरण म्हणता येईल. बाजाराची अशीच जाण असणारी एक तरुणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ही तरुणी तिचे दुर्गंधी मोजे आणि शूज ऑनलाइन विकत आहे. का तर केवळ तिचे पाय सुंदर आहेत म्हणून... रोक्सीच्या या अनोख्या बिझनेसची सुरुवात इन्स्टाग्रामवर पेजवरुन झाली. रोक्सीने एक इन्स्टाग्राम अकाउंट तयार करुन पायांवर प्रेम करणारे किती लोक अशाप्रकारच्या वस्तूंमध्ये इंटरेस्टेड असतात, हे जाणून घेतलं. एका महिन्यात रोक्सीचे १० हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स झालेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यावसायिकाने रोक्सीला संपर्क साधला आणि डील झाली. त्यात २० पाउंड एका मोज्यांच्या जोडीसाठी आणि २०० पाउंड शूजसाठी किंमत ठरली. यातील १० टक्के कमिशन व्यावसायिक घेणार हे ठरलं. आता चार वर्षांनंतर रोक्सीने आपला बिझनेस सेट केला आहे. आपल्या या अनोख्या आणि विचित्र आयडियाच्या माध्यमातून ती दर महिन्याला सरासरी ८ हजार पाउंडची कमाई करते. भारतीय रुपयात किंमत ७.५ लाख रुपये इतकी होते. 'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार, रोक्सी सांगते की, माझे मित्र हे नेहमीच माझ्या पायांचं कौतुक करायचे. सुरुवातील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू फॉलोअर्स वाढवले. पण नंतर आणखीही वेगळ्याप्रकारे मी जास्त कमाई करु शकते असे मला वाटले. आधी मी केवळ माझ्या पायांचे फोटो दाखवत होते. पण लोकांना उत्सुकता होती ती मला बघण्याची. नंतर मी इतर वेबसाइटच्या माध्यमातून माझ्या बिझनेसचा विस्तार वाढवला आणि पहिल्या महिन्यात मी २ हजार पाउंड कमाई केली.टॅग्स :जरा हटकेव्यवसायसोशल मीडियाJara hatkebusinessSocial Media