जयपूरचा शाही परिवार ज्यांचा मान आणि शान आजही आहे कायम, महाराजा 'या' मुलीला करतोय डेट By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 02:21 PM 2021-08-05T14:21:40+5:30 2021-08-05T14:30:21+5:30
Jaipur Royal Family Facts : पद्मनाभ सिंह याला २०११ मध्ये जयपूरचा महाराजा घोषित केलं होतं. तो जयपूरच्या शाही परिवाराचा सदस्य आहे आणि अब्जो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. भारतात लोकशाही आल्यावर राज परिवारांचा थाट भलेही हिरावून घेतला गेला असेल, पण आजही त्यांचे वंशज त्याच थाटात जगताना बघितले जाऊ शकतात. मग ती २१ वर्षीय फॅशनिस्टा प्रिन्सेस गौरवी कुमारी असो वा पोलो खेळाचा शौकीन असणार २३ वर्षीय राजकुमार पद्मनाथ सिंह असो. त्याने तर D&D सारख्या ब्रॅंडसाठी रॅम्पवॉकही केला आहे. ऑस्ट्रेलियन इतिहासकार जॉन जुब्रजायकीने 'हाउस ऑफ जयपूर' नावाच्या पुस्तकात जयपूरच्या शाही परिवाराबाबत विस्ताराने लिहिलं आहे.
पद्मनाभ सिंह याला २०११ मध्ये जयपूरचा महाराजा घोषित केलं होतं. तो जयपूरच्या शाही परिवाराचा सदस्य आहे आणि अब्जो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे. भारतात लोकशाही असल्याने त्याला मिळालेल्या उपाधीला कायदेशीर मान्यता नाही. पण या उपाधीला आजही सन्मान आहे.
'डेली मेल'च्या एका रिपोर्टनुसार, पद्मनाभ सिंह फ्रान्सच्या एका सुंदर ज्वेलरी डिझायनर क्लेर डेरूला डेट करत आहे. मात्र, दोघेही सोशल मीडियावर एकत्र फोटो टाकणं टाळतात. जगात अशा फार कमी व्यक्ती आहेत ज्या या रॉयल क्लास फॅमिलीची बरोबरी करू शकतील. नुकतेच या दोन्ही परिवारांचे परदेशात सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो समोर आले होते.
प्रिन्सेस गौरवी आणि क्लेर अनेक वर्षापासून चांगल्या मैत्रीणी आहेत आणि लॉकडाऊनमध्ये दोघेही जयपूर येथील महालात एकत्र होत्या. प्रिन्सेस गौरवीने नुकतंच न्यूयॉर्कच्या एका कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. चला जाणून घेऊन या शाही परिवाराबाबात आणखी विस्ताराने.
या शाही परिवाराची देखरेख करणारी ५० वर्षीय कुलमाता राजकुमारी दीया कुमारी आहे. जी जयपूरचे महाराजा भवानी सिंह आणि सिरमुरची राजकुमारी पद्मिनी देवीची एकुलती एक मुलगी आहे. २०१९ मध्ये 'द वीक' ला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, 'बालपणापासून माझं संगोपन फार सामान्य पद्धतीने झालं आहे. माझ्या आई-वडिलांनी नेहमीच मला हे शिकवलं आहे की, मी इतरांपेक्षा मोठी नाही'.
१९९८ मध्ये ठिकाना कोठाराचे महाराज नरेंद्र सिंह यांच्यासोबत गपचूप लग्न करण्याआधी त्यांनी लंडनच्या एका कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. २०१८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना तीन अपत्ये आहेत. पद्मनाभ सिंह आणि गौरवी कुमारी याच दोघांची अपत्ये आहेत.
२०१३-१८ पर्यंत त्या विधानसभा सदस्य होत्या. दीया कुमारी आता खासदार आहेत. इतिहास, कला आणि संगीताप्रति त्यांची आवड नेहमीच दिसते. परिवाराची देखरेख करण्यासोबतच त्या प्रिन्सेस दीया कुमारी फाउंडेशनसोबतही जुळल्या आहेत. याद्वारे त्या गरीब महिलांना शिक्षण देतात आणि सशक्त करतात.
महाराजा पद्मनाभ सिंह यांच्या लक्झुरिअल लाइफची झलक त्यांच्या इन्स्टाग्रामवरून बघायला मिळते. आपले आजोबा भवानी सिंह यांच्याप्रमाणेच पद्मनाभ एक जबरदस्त पोलो प्लेअर आहे. २०१७ मध्ये वर्ल्ड कप पोटो टीमचा सर्वात कमी वयाचा सदस्य आणि इंडियन ओपन पोलो कपचा सर्वात कमी वयाचा विजेताही आहे.
इन्स्टाग्रामवर पद्मनाभचे साधारण १ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत. ज्यावर त्याचा शाही अंदाज आणि पोलोसाठीचं प्रेम दिसतं. एका फोटो तो प्रिन्स विलियम अलेक्झांडर प्रिन्सेस मॅक्सिमा आणि त्यांच्या मुलांसहीत डच शाही परिवारासोबत फिरताना दिसत आहे.
एका स्टायलिश महाराजा असण्यासोबतच पद्मनाभ धार्मिकही आहे. तो दरवर्षी नवरात्रीनंतरच्या उत्सवात सहभागी होतो. ५ वर्षाआधी १८ वर्षांचा झाल्यावर त्याने अनेक मंदिरांचा दौरा केला होता. पद्मनाभने न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीतून लिबरल आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे.
तेच सांगायचं प्रिन्सेस गौरवी कुमारीबाबत तर तिने बिझनेस फॅशन आणि मीडियाचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर ती फार अॅक्टिव असते. लॉकडाऊनमध्ये तिने आई आणि भावांसोबत जास्त वेळ घालवला.
दीया कुमारी यांच्या सर्वात लहान मुलाचं नाव आहे लक्ष्य राज सिंह. लक्ष्य १७ वर्षाचा आहे आणि तो सोशल मीडियावर कमीच अॅक्टिव असतो. तो ९ वर्षांचा असताना त्याला हिमाचल प्रदेशातील एक जिल्हा सिरमौरचा महाराजा घोषित केलं होतं.