Russia Has Biggest And Deepest Hole In The World A Mysterious, Can Suck Anything Flies Overhead
रशियाचं सर्वात मोठे रहस्य! हा अजब खड्डा हवेत उडणाऱ्या विमानालाही खेचू शकतो By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:03 PM2022-03-24T17:03:05+5:302022-03-24T17:08:07+5:30Join usJoin usNext यूक्रेनसोबत युद्धात बलाढ्य रशियाला आजही विजय मिळवता आला नाही. रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे हल्ले सुरू असून या युद्धाला जवळपास एक महिना उलटून गेला आहे. रशिया आपल्या गुप्तचर संस्थांमुळे जगभर प्रसिद्ध आहे आणि तेथे काही अशी ठिकाणेही आहेत ज्यांचे रहस्य आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. असेच एक ठिकाण पूर्व रशियातील सायबेरिया भागात आहे, ज्याला खाणींचे शहर म्हटले जाते. मिर्नी असं या शहराचे नाव आहे जे जगात आपली वेगळी ओळख टिकवून आहे. 'डेलीस्टार'च्या बातमीनुसार, मिर्नी हे शहर एका मोठ्या हिऱ्याच्या खाणीभोवती वसले आहे. ही खाण १ हजार ७७२ फूट खोल असून तिचा व्यास सुमारे ४ हजार फूट आहे. ही जगातील सर्वात मोठ्या खाणींपैकी एक आहे आणि त्यात अनेक रहस्यमय हिरे असल्याचे मानले जाते. हिऱ्याच्या खाणीचा हा खड्डा वरून जाणारी कोणतीही वस्तू खेचू शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. वरून उडणारी छोटी विमाने आणि हेलिकॉप्टरही त्याचा फटका बसू शकतात. मिर्नी शहराची स्थापना १९५५ च्या आसपास झाली, जेव्हा सोव्हिएत युनियन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी स्वतःला तयार करत होते. हे संपूर्ण शहर खांबांच्या वर बांधले गेले आहे आणि येथे राहणारी बहुतांश लोकसंख्या अल्रोसा नावाच्या कंपनीसाठी काम करते. या भागात एवढी थंडी पडते की, वाहनांचे टायरही फुटतात आणि तेल गोठते. हिऱ्यांच्या शोधादरम्यान शास्त्रज्ञांना असं आढळून आले की हिवाळ्यात येथील तापमान उणे ४० अंशांपर्यंत जाते. १९५७ मध्ये या शहरात हिरे सापडल्यानंतर खाणीच्या बांधकामाचा आदेश काढण्यात आला होता. मात्र येथील हवामानामुळे हे काम खूपच अवघड होते. या कारणास्तव ही खाणही अनेकदा बंद करण्यात आली आहे. १९६० पासून कार्यान्वित झाल्यानंतर या खाणीतून अनेक मौल्यवान हिरे काढण्यात आले आहेत. या खाणीतून ३४२ कॅरेटचा पिवळा हिरा सापडला, जो कोणत्याही देशात सापडलेला हिऱ्यांपैकी सर्वात मोठा हिरा होता. पहिल्या दशकात, खाणीतून प्रतिवर्षी १०,०००,००० कॅरेट हिरे तयार झाले, त्यापैकी २० टक्के दर्जेदार हिरे होते. या खाणीतून ३४२.५७ कॅरेटचा फॅन्सी लिंबू पिवळा हिरा सापडला आहे. या खाणीत अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचे उत्पादन होते मात्र २००४ साली अचानक ही खाण बंद करण्यात आली. याचे कारण देत अधिकाऱ्यांनी येथे उत्खनन शक्य नसून त्याचे रहस्य उलगडणेही अवघड असल्याचे सांगितले होते. या मोठ्या खड्ड्यावर नो-फ्लाय झोन तयार करण्यात आला कारण खाणीमुळे विमान खेचले जाण्याची भीती होती. खाणीची खोली जास्त असल्याने छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर आत जाण्याची भीती आहे. याचे कारण हवेचा दाब असल्याचे मानले जात आहे. खाणीच्या पृष्ठभागावरील गरम हवा आतून येणाऱ्या वातावरणात मिसळते तेव्हा एक प्रकारचं शक्तिशाली चक्रीवादळ तयार होतं आणि ते काहीही खोलवर ओढू शकतो.टॅग्स :रशियाrussia