बघा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नवीन हायटेक कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 12:21 PM2018-10-04T12:21:47+5:302018-10-04T12:41:57+5:30

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा दौरा दोन्ही देशातील राजकीय संबंधांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण त्यांच्या या भेटीचा आंतरराष्ट्रीय राजकारणात परिणाम बघायला मिळू शकतात. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्या स्पेशल कारबाबत काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. पुतिन हे मर्सिडीज बेंज लिमोजिन लक्झरी कार वापरतात. चला जाणून घेऊ या कारची खासियत...

ही कार रशियामध्येच तयार करण्यात आली असून सोव्हिएत संघाच्या काळाची आठवण करुन देते. कारण त्यावेळी सोव्हिएत लीडर जिल लिमोजिनमध्ये फिरत असत.

ज्या कारमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आलेत, ती लिमोजिन २०१३ मध्ये तयार केली जात होती. पण गेल्यावर्षी या कारची निर्मिती रशियामध्ये सुरु झाली.

Limousine या कारची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या हायटेक कारमध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारची अनेक दिवसांपासून टेस्टिंग सुरु होती. नुकतीच या कारने क्रॅश टेस्ट पास केली. सर्वच टेस्टमध्ये ही कार पास झालीये.

ही अत्याधुनिक कार तयार करण्यासाठीच्या 'प्रोजेक्ट कॉर्टेज'वर १२.४ बिलियन रुबेल म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास १३ अरब रुपयांपेक्षाही जास्त गुंतवणूक करण्यात आली.

या रशियन लिमोजिनची साइज 6,000 mm पेक्षा अधिक आहे आणि ही एक मल्टीपर्पज कार आहे. ही कार लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

या कारमध्ये ४.४ लिटरचं टर्बोचार्ज्ड इंजिन आहे जे ६०० हॉर्सपॉवरची ताकद जनरेट करतं. या इंजिनला ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.