एअरपोर्टवर करत आहेत लोक डुकरांसोबत फोटोशूट, जाणून घ्या 'का'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 04:30 PM2019-12-19T16:30:57+5:302019-12-19T16:54:10+5:30

प्रवाश्यांचे मनोरंजन करण्यासाठी सन फ्रॅन्सिस्को या विमानतळावर चक्क डुकराच आगमन झाले आहे.

वॅग ब्रिगेड एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी प्रवाश्यांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी डुकरांना आणलं जातं आणि ते ही डुकरांना वेगवेगळ्या रंगाचा ड्रेस घालून तयार केलं जातं. त्यातील एका डुकराचे नाव लिलोउ आहे.

एखाद्या पायलटप्रमाणे टोपी आणि चमकदार नखांनी डुकरांची तयारी केली जाते.

लिलोउ या विमानतळावर असलेल्या मेटल डिटेक्टर पासून मुख्य दरवाज्यापर्यंत सगळ्यांचं मनोरंजन करतो.

प्रवाश्यांचे स्वागत करण्यासाठी ही लिलोउ आपली नखं त्यांना दाखवत असतो.

अनेक प्रवाशी लिलोउसोबत सेल्फी काढत असतात.

लिलोउ आपल्या पियानोची धून वाजवून प्रवाश्यांना रवाना करत असतो.

लिलोउ या डुकरासोबत अनेक प्राणी वॅग ब्रिगेड येथे आहेत. त्यात सगळ्यात जास्त कुत्र्यांचा समावेश आहे.

लिलोउने अलिकडेच हैलोइन उत्सवात भाग घेतला होता.

लिलोउचा गेटअप हा पाहण्यासारखा असतो. तसंच त्यांची ज्वेलरी आणि कपडे आकर्षक असतात.