३३५ महिलांना डेट करूनही हा म्हणतो, माझं उद्देश्य अजून पूर्ण झालेलं नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:22 PM2021-08-15T17:22:48+5:302021-08-15T18:15:34+5:30

आतापर्यंत ३३५ महिलांना डेट करणाऱ्या या अवलियाचं उद्देश्य अजूनही सफल झालेलं नाही. तो इतक्या महिलांना का डेट करतोय? त्यातून त्याला काय साध्य करायचंय? हा नेमका कोण आहे? हे घ्या जाणून

सुंदर रामू यांनी गेल्या आतापर्यंत ३३५ मुलींना डेट केलंय. मात्र, त्यांना आणखी ३० महिलांसोबत डेटवर जायचंय. त्यांच टार्गेट अजून पूर्ण झालेलं नाही. त्यांना 365 मुलींना डेट करायचं आहे.

सुंदर रामू यांचा घटस्फोट झालेला आहे आणि त्यांना रोमांसचं काहीही वावडं नाही. जाणून घेऊया रामु यांच्या उद्देश्य काय आहे?

रामु सुंदर तमिळ अभिनेते, डान्सर आणि फोटोग्राफर आहेत. त्यांनी आतापर्यंत ३३५ महिलांना डेट केलंय. मात्र, त्यांचं टार्गेट अजून पूर्ण झालेलं नाही. त्यांना ३६५ महिलांना डेट करायचं आहे.

बीबीसीशी बोलतताना रामु म्हणाले, खूप रोमँटिक आहे. मी दररोज प्रेमाचा शोध घेत असतो. पण एखादी साथीदार शोधणं हा काही ३६५ डेट्स मागचा उद्देश नाही. तर, महिला हक्कांविषयी जागरुकता निर्माण करण्याचा माझा उद्देश आहे.

सुंदर म्हणतात, स्त्रीला आदराची वागणूक मिळणाऱ्या घरात माझा जन्म झाला. पण, मी जेव्हा खऱ्या जगात पाय ठेवला तेव्हा स्त्री-पुरूष भेद आपल्या समाजात किती खोलवर रुजला आहे, याची मला जाणीव झाली. हा माझ्यासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता. रामू यांनी डेटिंग प्रोजेक्टची सुरुवात २०१५ या वर्षी केली होती.

सुंदर रामू यांनी डेट केलेल्या महिलांमध्ये इमारतीत कचरा वेचणारी स्त्री, 90 वर्षांच्या नन, अभिनेत्री, मॉडेल, योगा टीचर, सामाजिक कार्यकर्त्या, राजकारणी महिला आणि इतरही अनेक महिलांचा समावेश आहे.

रामुंनी डेट केलेल्या स्त्रियांमध्ये १०५ वर्षांच्या आजीचाही समावेश आहे. मात्र, आता त्यांचं निधन झालंय.

सुंदर रामु यांच्या मते, एखाद्या मुलीला भेटणे किंवा तिला डेटवर घेऊन जाणे याकडे अत्यंत वाईट दृष्टीकोनातून पाहिले जाते. स्त्री व पुरुष या दोघांच्या संवादातून एकदुसऱ्याला समजणं, जाणून घेणं महत्वाचं आहे. स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्यापेक्षा तिची माणूस म्हणून जडणघडण जाणून घेणं सुंदर यांना जास्त औत्सुक्याचं वाटतं.

सुरुवातीच्या त्यांच्या डेट्स त्यांच्या ओळखीच्या महिलांसोबत होत्या. दहाव्या डेटनंतर वृत्तपत्रांनी ही बातमी छापली आणि त्यानंतर त्यांना अनोळखी स्त्रियांकडूनही निमंत्रणं येऊ लागली.

सुंदर रामू यांनी आजवर भारत, व्हिएतनाम, स्पेन, फ्रान्स, अमेरिका, थायलंड आणि श्रीलंकेसह विविध देशांतील महिलांना डेट केलं आहे..