Shardul Kadam and Tanuja Patil life after Marriage
बायकोनं नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र; वाचा ‘त्या’ युवकासोबत लग्नानंतर काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:25 AM2021-11-03T10:25:13+5:302021-11-03T10:34:51+5:30Join usJoin usNext भारतीय लग्नाची रुढी-परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहेत. लग्नात नवऱ्यानं बायकोला मंगळसूत्र घालायचं अशी प्रथा आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी २९ वर्षीय शार्दुल कदम नावाच्या युवकानं त्याची बायको तनुजाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याने त्याची खूप चर्चा झाली होती. डिसेंबर महिन्यात शार्दुल-तनुजानं लग्न केले होते. शार्दुलनं या लग्नात नवी प्रथा सुरु केली त्यामुळे तो सोशल मीडियात चर्चेत आला. या कपल्सनं एकमेकांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. नवऱ्यानं बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायचं हे ठरलेलं असतं परंतु बायकोने नवऱ्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणे सर्वांसाठी चर्चेचा विषय बनलं. लैंगिक समानता आणि पुरुषप्रधान संस्कृती याविरोधात शार्दुलनं हा प्रयत्न केला होता. मंगळसूत्र लग्नाचं लेबल नाही तर प्रेमाचं प्रतिक आहे. ४ वर्षापूर्वी शार्दुल-तनुजाने डेटिंग सुरु केले होते तेव्हाच दोघांनी एकमेकांशिवाय वेगळं काही करायचं नाही ठरवलं. शार्दुलनं जेव्हा तनुजासोबत याची चर्चा केली तेव्हा ती हैराण झाली. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात करू असं शार्दुलनं ठरवलं. जेव्हा साखरपुड्यात अंगठी बदलली जाते तेव्हा आक्षेप घेतला जात नाही मग लग्नात मंगळसूत्र घालण्यावर का प्रश्न उचलतात असं शार्दुल म्हणतो. लग्नाच्या दिवशी संपूर्ण समारंभात मी घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेणारे केवळ पुजारी होते. शार्दुल आणि तनुजा यांच्या या पावलानं अनेकांच्या मनात शंका आली. परंतु दोघांच्या घरच्यांनी त्याला विरोध केला नाही. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर जीवन जगण्याची शपथ घेतली. शार्दुलनं लिहिलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यावर अनेकांनी ट्रोल केले होते. अनेकांच्या कमेंट्स वाचून तो निराश झाला होता. एक सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने मी ते पाऊल उचललं होतं असं त्याने सांगितले. परंतु त्यानंतर हळूहळू मंगळसूत्रातील डिझाईनमुळे ते आकर्षक वाटू लागलं. तनुजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचा माझा वैयक्तिक निर्णय होता. परंतु या घटनेने सोशल मीडियात अनेकांनी माझ्यावर आक्षेप घेत मी परंपरा तोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. परंतु मी केवळ सकारात्मक बदल घडावा यासाठी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. शार्दुलनं एका डिझाईनरकडून मंगळसूत्र बनवून घेतलं. त्यात काळ्या मोतीसोबत एक पेडेंड होतं. बायकोपेक्षाही मोठं मंगळसूत्र शार्दुलनं बनवलं. प्रत्येक सण समारंभाला ते दोघं एकमेकांना मंगळसूत्र घालून लग्नाचे दिवस आठवतात. शार्दुलनं मंगळसूत्राबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या. मार्केटिंग कम्युनिकेशन कंसल्टेंट शार्दुल जेव्हा ऑफिसमध्ये मंगळसूत्र घालून गेला तेव्हा त्याला वाटलं की त्याचे सहकारी त्याच्याबद्दल मतं बनवतील. परंतु असे काही घडले नाही. शार्दुलनं घेतलेल्या धाडसी निर्णयाचं सहकाऱ्यांनी कौतुक केले. लग्नाच्या नंतरही खूप दिवस शार्दुलला ट्रोल व्हावं लागलं. सुरुवातीला ऑफिसमध्ये शार्दुल मोठं मंगळसूत्र परिधान करत जायचा त्यानंतर त्याने मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये ब्रेसलेट बनवलं. आता विशेष समारंभाला, सणाला शार्दुल बायकोप्रमाणे मोठं मंगळसूत्र घालतो.