Lockdown : सिंगल पुरूष अन् महिलांना सरकारचा सल्ला, 'शारीरिक संबंधासाठी पार्टनर शोधा'...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 12:24 PM2020-05-16T12:24:06+5:302020-05-16T12:39:38+5:30

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे नेदरलॅंडमध्येही लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण काही अटींसह घरात तीन व्हिजीटर्सला लोक बोलवू शकता.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी आणि लोकांच्या सोयीसाठी वेगवेगळे नियमही करण्यात आले आहेत. असाच एक आश्चर्यकारक निर्णय नेदरलॅंडमध्ये करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे नेदरलॅंडमध्येही लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण काही अटींसह घरात तीन व्हिजीटर्सला लोक बोलवू शकता.

आता सरकारने सिंगल पुरूष आणि महिलांना सेक्स पार्टनर शोधण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सेक्स पार्टनर शोधताना काही गोष्टींची खास काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

नेदरलॅंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ अ‍ॅन्ड द इन्वायर्नमेंटकडून सांगण्यात आले आहे की, सिंगल लोकांनी एका दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्याची व्यवस्था करावी.

पण जर कुणामधे कोरोनाची लक्षणे असतील तर शारीरिक संबंध ठेवू नये.

याआधी नेदरलॅंडमध्ये सरकारवर टीका होत होती की, सिंगल लोकांना शारीरिक संबंधाबाबत कुणी काही सल्ला देत नाहीये.

23 मार्चपासून नेदरलॅंडमध्ये सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

याआधीच्या गाइडलाईनमध्ये सरकारने सांगितले होते की, घरात एखाद व्हिजीटर आला तर 1.5 मीटरचं अंतर ठेवावं. पण नियमावर लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

RIVM च्या सल्ल्यानुसार सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांकडे स्थायी सेक्शुअल पार्टनर नाहीत, ते त्यांच्यासारख्या लोकांसोबत राहण्याचा आपसात करार करू शकतात.

सोबतच याचीही चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे की, दोन्ही किती पार्टनर किती इतर लोकांना भेटणार आहेत. कारण ते जेवढ्या जास्त लोकांना भेटतील कोरोनाचा धोका अधिक वाढेल.