'या' सहा कुंडातील पाणी थंडीत सुद्धा असतं गरम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 03:59 PM2019-01-11T15:59:55+5:302019-01-11T16:05:46+5:30

यमुनोत्री उत्तराखंड राज्यात यमुना नदीचे उगम स्थळ मानले जाते. यमुनोत्रीच्या जवळच विविध कुंड तयार झालेले आहेत, ज्यामधील सूर्यकुंड गरम पाण्याचे प्रसिद्ध कुंड आहे. या कुंडातील पाणी एवढे गरम राहते की, हातामाध्येही घेतले जाऊ शकत नाही.

हिमाचल प्रदेशातील कुल्लूपासून 45 किलोमीटरवर मनीकरण ठिकाण असून, येथील पाणी खूप गरम आहे. येथील पाण्यामध्ये सल्फरचे जास्त प्रमाण असून युरेनियम आणि इतर रेडियोएक्टिव तत्व आढळून येतात. या पाण्याचे तापमान खूप जास्त आहे. हे स्थान हिंदू आणि शीख लोकांचे श्रद्धाकेंद्र आहे.

गुजरातमधील तुळस-श्याम कुंड, जुनागढपासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. येथे गरम पाण्याचे तीन कुंड आहेत. येथील खास गोष्ट म्हणजे, तिन्ही कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे राहते. या कुंडाजवळच 700 वर्ष जुने रुक्मिणी देवीचे मंदिर आहे.

पश्चिम बंगालमधील बकरेश्वर एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. या कुंडातील गरम पाण्यात स्नान करण्यासाठी देश-परदेशातून अनेक भाविक येतात.

सिक्कीम येथील युमेसडोंग कुंड सर्वात प्रसिद्ध स्थळांमधील एक आहे. उत्तर-पूर्व राज्यामध्ये स्थित असलेले हे कुंड 15500 फूट उंचीवर आहे.

लडाखमधील पनामिक येथील व्हॅली सियाचीन ग्लॅशियरपासून 9 किलोमीटरवर आहे. हे ठिकाणी गरम पाण्याचे कुंडामुळेही ओळखले जाते. येथील पाणी खूप गरम आहे. पाण्यातून उकळ्या फुटलेल्या दिसतात.