Ichthyosaurs: ब्रिटनच्या संशोधकांना सापडला 9 कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या 'इचथियोसॉर'चा सांगाडा By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 12:36 PM 2022-01-11T12:36:45+5:30 2022-01-11T12:42:45+5:30
Ichthyosaurs: समुद्रात आढळणारा 'इचथियोसॉर' सूमारे 25 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळत असे. पण, 9 कोटी वर्षांपूर्वी हा इतर अनेक प्राण्यांसोबत नामशेष झाला. पृथ्वीवर कोही कोटी वर्षांपूर्वी अनेक अजस्त्र प्राण्यांचे वास्तव्य होते. पण, उल्कापिंडामुळे झालेला विद्धवंस आणि इतर कारणांमुळे अनेक प्राणी नामशेष झाले. पण, या प्राण्यांचे सांगाडे आजही आपल्याला पृथ्वीवर आढळलात.
ब्रिटनमधील शास्त्रज्ञांना मिडलँड परिसरात अशाच प्रकारचा एक अजस्त्र सांगाडा सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांना 18 कोटी वर्षे जुना महाकाय 'समुद्री पाण्या'चा (इचथिओसॉर) सांगाडा सापडला आहे.
डॉल्फिनसारखा दिसणारा हा सागरी ड्रॅगन 30 फूट लांब आहे. तसेच, फक्त त्याच्या कवटीचे वजन फक्त 1 टन आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा आणि संपूर्ण जीवाश्म आहे.
इचथियोसॉर प्रथम 19व्या शतकात जीवाश्मशास्त्रज्ञ मेरी अॅनिंग यांनी शोधला होता. आता सापडलेला सांगाडा जो डेव्हिस यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये शोधला आहे.
मिडलँड परिसरातील रुटलँडच्या पाण्याजवळ सापडलेला हा सागरी ड्रॅगन 82 फुट लांब आहे. मोठे दात आणि डोळ्यांमुळे इचथियोसॉरला समुद्रातील ड्रॅगन म्हटले जाते.
या सागरी प्राण्याचा अभ्यास करणारे डॉ. डीन लोमॅक्स म्हणाले, 'ब्रिटनमध्ये इचथियोसॉरचे अनेक जीवाश्म सापडले आहेत, पण हा सांगाडा ब्रिटनमध्ये सापडलेला सर्वात मोठा सांगाडा आहे.
दिसायला आजच्या डॉल्फिनसारखा असणारा इचथियोसॉर प्राणी जगात प्रथमतः 25 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आणि 9 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाले.
इचथिओसॉरचे वास्तव्य इंग्लंड आणि अटलांटिक समुद्राच्या पाण्यात होते. इचथियोसॉरचे डोळे आणि दात त्याच्या शरीराच्या तुलनेत मोठे असायचे.
संशोधनात असे दिसून आले की, माशांच्या आकाराच्या इचथिओसॉरचा आकार सुमारे 24 कोटी वर्षांपूर्वी खूप वेगाने वाढला होता. या प्राण्याच्या फक्त डोक्याचा आकार 6.5 फूट इतका होता.
कॅलिफोर्नियातील स्क्रिप्स कॉलेजमधील जीवशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आणि वरिष्ठ जलचर संशोधक लार्स श्मिट्झ यांनी अभ्यासात सांगितले की, इचथियोसॉर व्हेल माशाच्या तुलनेत खूप वेगाने वाढले होते.
डायनासोरसारखे प्राणी पृथ्वीवरुन वेगाने नामशेष होत होते, तेव्हा हा प्राणी पृथ्वीवर जगण्यासाठी धडपड करत होता. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे, यामुळे अनेक रहस्ये उघड होतील, असे ते म्हणाले.