मोबाईल चार्जरमुळे दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, 'या' देशात ३५५ लोक गेले विजेच्या झटक्याने By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:44 PM 2021-08-27T18:44:27+5:30 2021-08-27T19:35:11+5:30
लहान मुले घरात असली की त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. खासकरून घरातील विजेच्या उपकरणांपासून. खेळताखेळता काही अघटीत घडू नये म्हणून आपण त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. ब्राझीलमध्ये एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा मोबाईलच्या चार्जरमुळे मृत्यू झाला...कशी घडली ही घटना? पुर्व ब्राझीलच्या एरेरे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या चार्जरला हात लावल्याने एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार मोबाईल चार्जरला हाताळताना लागलेल्या विजेच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.
त्या २ वर्षाच्या मुलीचे नाव सारा डी अल्बुकर्क असे असून तिला शॉक लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथेच तिचा मृत्यू झाला.
दिलेल्या रिपोर्टमध्ये हा मृत्यू होण्यास कारणीभूत असलेला चार्जर कोणत्या ब्रँडचा होता हे म्हटलेले नव्हते. मात्र साराला अनेकांनी श्रद्धांजली वाहिली
तेथील स्थानिक मेयर इमानुएल गोम्स मार्टिंस यांनी फेसबुकवर साराला श्रद्धांजली दिली.
फेसबुक युजर विवियन गोम्स फ्रिटास यांनी लिहिले की, रेस्ट इन पीस सारा, तु आता एक छोटीशी दोन पंखांची परी झाली आहेस.
सेलिया पावा नावाच्या सोशल मिडिया युजरने लिहिले की अशावेळी भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण होतं. मी साराच्या आईवडिलांना आणि कुटुंबियांना हे सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना करते.
ब्राझीलमध्ये गेल्यावर्षी ३५५ लोकांचा विजेच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. यामध्ये एका २८ वर्षीय युवकाचाही समावेश होता.
किट्टीसाक मुनुकिट्टी असे त्या युवकाचे नाव होते. तो मृत झाला त्यावेळी त्याच्या हातात मोबाईलचा हँडसेट होता. आणि हातावर जळलेल्याच्या जखमा होत्या.
पश्चिम थायलंडच्या चोनाबुरी येथे राहणाऱ्या एका रि्न्नापोर्न नावाच्या आईने २०१९ साली अशीच घटना पाहिली होती