भारतातील सर्वात खतरनाक भूलभुलैया; एकदा आत गेलं की बाहेर येणं अशक्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 06:48 PM2021-08-13T18:48:15+5:302021-08-13T18:51:52+5:30

पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत की त्या ठिकाणांवरील रहस्यमय गोष्टींमुळे त्या चर्चेत येतात. अशीच काही रहस्यमय ठिकाणं भारतात देखील आहेत.

भारतात अशी काही ठिकाणं आहेत की तेथील रहस्यमय गोष्टींमागचं सत्य आजवर समोर आलेलं नाही. यात गुहा, किल्ले आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे.

भारतातील मेघालय येथील अशाच एका ठिकाणाची जोरदार चर्चा आहे. येथील एक गुहा रहस्यमय गोष्टींसाठी ओळखली जाते.

मेघालय येथील क्रेम पुरी नावाच्या गुहेबाबत अनेक रहस्यमय कहाण्या सांगितल्या जातात. २०१६ साली शास्त्रज्ञांच्या एका टीमनं या गुहेचा शोध लावला होता.

वालुकामय दगडांची ही जगातील सर्वाधिक लांबीची गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

अतिशय भयावह दिसणाऱ्या या गुहेचं प्रवेशद्वार देखील उंच आणि तीक्ष्ण खडकांचं असून अंगावर काटा आणणारं आहे.

सर्वाधिक पाऊस होण्यासाठी लोकप्रिय असलेल्या मासिनरामच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये ही गुहा तब्बल १३ किलोमीटर इतकी पसरली आहे. गुहेत तापमान १६ ते १७ डिग्री सेल्सियस इतकं असतं.

व्हेनेझुएला येथील क्यूवा डेल समन नावाच्या गुहेची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या गुहेची लांबी ६ हजार मीटरपेक्षाही अधिक आहे. पण क्रेम पुरी गुहा क्यूवा डेल समन गुहेपेक्षाही लांब असल्याचं सिद्ध झालं आहे.

गुहेचा शोध घेतलेल्या मेघालय अॅडवेंचर असोसिएशननं या गुहेचं नाव क्रेम पुरी असं ठेवलं आहे.