Spain Ghost Case:1990चा एक असा खटला, ज्यात पोलिसांनाही दिसलं होतं भूत; आजही रेकॉर्डमध्ये आहे नोंद... By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 04:26 PM 2022-06-01T16:26:03+5:30 2022-06-01T16:45:24+5:30
Spain Ghost Case: 1990 मध्ये एका 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर काही विचित्र घटना घडू लागल्या, पोलिसांना या तपासात अनेक विचित्र गोष्टी आढळून आल्या होत्या. आजही ही केस कोणी सोडवू शकले नाही. Spain Estefania Ghost Case: स्पेनमधील माद्रिद शहर फुटबॉलसाठी ओळखले जाते. पण, या शहरात कधीकाळी लोकांनी असा विचित्र प्रकार पाहिला, की आजही लोकांना त्याची भीती वाटते. हे संपूर्ण प्रकरण 1990 च्या दशकातील 18 वर्षीय एस्टेफानिया गुटेरेझ लाझारो नावाच्या मुलीची आहे. ती माद्रिदमधील व्हॅलेकस येथे एका अपार्टमेंटमध्ये तिच्या पालकांसह राहत होती. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत एस्टेफानियाच्या आयुष्यात सर्व काही ठीक सुरू होतं, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर अचानक तिचं वागणं बदलू लागलं.
तिच्या भावाला बघून ती गुरगुरायची आणि कधी-कधी सापासारखा फुस..आवाज करायची. ती भिंतींवर नखांनी ओरखडायची. तिच्या या कृत्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली. एके दिवशी पालकांना कळले की एस्टेफानिया काळ्या जादूची पुस्तके वाचते. ऑगस्ट 1991 मध्ये, एस्टेफानियाची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर तिला माद्रिदच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. 3 आठवड्यांच्या उपचारानंतरही डॉक्टरांना तिच्यात कोणता आजार दिसून आला नाही. एके दिवशी एस्टेफानियाच्या आई-वडिलांना कळले की तिचा मृत्यू झाला आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे एस्टेफानियाचा मृत्यू झाल्याचे अहवालात लिहिले होते.
एस्टेफानियाच्या मृत्यूच्या एका आठवड्यानंतर, तिच्या कुटुंबाला एक विचित्र गोष्ट लक्षात आली. जेव्हा त्यांनी एस्टेफानियाची खोली उघडली तेव्हा त्यांना चादर जमिनीवर पडलेली, वस्तू इकडे-तिकडे विखुरलेल्या दिसल्या. त्यांना ही गोष्ट थोडी विचित्र वाटली, पण परत त्यांनी सर्व काही व्यवस्थित ठेवले. 2-4 दिवसांनी त्यांनी पुन्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि त्यांना पुन्हा त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या, ज्या त्या दिवशी त्याने पाहिल्या होत्या. यावेळी त्यांना थोडा धक्का बसला, कारण एस्टेफानियाच्या खोलीतून विचित्र आवाज येत असल्याचे आढळले. याशिवाय त्यांना भिंतीवर नखांनी ओरखडल्याच्या खुणा दिसल्या.
आता त्यांना खात्री पटली आहे की काहीतरी विचित्र नक्कीच घडत आहे. कुटुंबीयांनी एस्टेफानियाच्या खोलीचा दरवाजा नट बोल्टने बंद केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा खोलीतून तेच आवाज येऊ लागले आणि कोणीतरी आई-आई म्हणून हाक मारत होते. यावेळी खोलीत बसवलेले सर्व नट आणि बोल्ट काढलेले दिसले. याबाबत एस्टेफानियाच्या पालकांनी शेजाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनाही रात्री घरातून आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, जेव्हा काही शेजाऱ्यांनी धाडस करून एस्टेफानियाच्या घरी रात्रीचा मुक्काम केला तेव्हा त्यांनीही तेच पाहिले आणि अनुभवले.
एस्टेफानियाच्या मृत्यूला 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले होते, तेव्हा अचानक एस्टेफानियाच्या कॉलेजचे शिक्षक तिच्या घरी पोहोचले आणि सांगितले की तिच्या मित्राच्या एका प्रियकराचा बाईक अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर एस्टेफानियाची मैत्रीण डिप्रेशनमध्ये गेली. एस्टेफानिया तिच्या मैत्रिणीच्या खूप जवळ होती. शिक्षिकेने पुढे सांगितले की एके दिवशी शाळेच्या मागच्या बाजूला तिला 4 मुली दिसल्या, त्यापैकी एक एस्टेफानिया आणि दुसरी तिची मैत्रीण होती. त्या एका पाटावर काहीतरी करत होते. एका लाकडाच्या बोर्डावर काचेचा ग्लास उलटा ठेवून मंत्र म्हणत होते. यावेळी एस्टेफानियाने काचेवर बोट ठेवल्यानंतर काचेचा ग्लास हवेत तरंगू लागला. यानंतर शिक्षकाने त्या सर्व मुलींना खडसावले आणि ते फलक तोडले. नंतर कळाले की, एस्टेफानिया भूताशी बोलत असे आणि बाईक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या त्या मुलाशीही बोलत होती.
कुटुंबाने पुन्हा तिची खोली उघडली आणि एस्टेफानियाचे चित्र जमिनीवर पडलेले आढळले. वडिलांनी ते चित्र पाहिल्यावर एस्टेफानियाच्या चेहऱ्याला आग लागल्याचे दिसले. त्यांनी पुन्हा एस्टेफानियाच्या खोलीला कुलूप लावले. दुसर्या रात्री असे काही घडले जे यापूर्वी कधीही घडले नव्हते. त्या रात्री एस्टेफानियाची आई झोपली असताना तिला असे वाटले की कोणीतरी तिच्यावर चढून तिचा श्वास कोंडत आहे. त्या अदृश्य शक्तीपासून मुक्त होण्याचा तिने खूप प्रयत्न केला. यानंतर दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिस प्रमुख जोस पेड्रो यांच्यासह आणखी 4 सहयोगी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पोलिस अधिकाऱ्यांनाही थंड वारा आणि विचित्र आवाज ऐकू आले. एस्टेफानियाच्या खोलीत प्रवेश केल्यावर तिथे जोराचा वारा वाहताना दिसला. पण बाहेर सगळं शांत होतं. पोलिसांनी इस्टेफानियाच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले आणि तेथून निघून गेले. मात्र प्रकरण काय असा प्रश्न पोलिसांच्या मनात घोळत राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिस पुन्हा तिच्या घरी पोहोचले, तेव्हा वडिलांनी सांगितले की, त्यांचा धाकटा मुलगा रात्री अचानक दुसरीकडे जायला लागतो. पोलिस परत एस्टेफानियाच्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना येशूचे चित्र उलटे पडलेले दिसले. या सर्व बाबी पोलिसांच्या अहवालात नोंदवण्यात आल्या आहेत. मीडियात ही बातमी आली, पोलिसांनीही मुलाखती दिल्या. सुमारे महिनाभर तपास करूनही पोलिसांना काहीही हाती न लागल्याने पोलिसांनी त्यांना घर सोडण्याचा सल्ला दिला आणि त्यांनीही ते घर रिकामे केले. घर बदलल्याबरोबर या सर्व गोष्टी थांबल्या. या घटनेवर वेरोनिका नावाचा चित्रपटही बनवण्यात आला होता.