इथे लग्नात मुलीवर थुंकून तिला आशीर्वाद देतात वडील, जाणून घ्या काय आहे ही अजब परंपरा... By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 05:32 PM 2022-07-28T17:32:56+5:30 2022-07-28T17:42:54+5:30
अनेक आदिवासी जमाती अशा काही रितीरिवाजांचं पालन करतात ज्याबाबत समजल्यावर लोक हैराण होतात. लग्न समारंभापासून ते मृत्यूपर्यंत अनेक विचित्र रिवाज पाळले जातात. जगभरात अनेक रहस्यमय लोकांचे समूह बघायला मिळतात. या लोकांच्या परंपरा, राहणीमान आणि खाद्यसंस्कृती फार वेगळी असते. जगभरात आजही अनेक आदिवासी लोक हजारो वर्ष जुन्या परंपरांचं पालन करताना दिसतात. हे लोक जंगलात राहतात आणि जंगलावर त्यांचा पूर्ण अधिकार असतो. अनेक सरकारेही आदिवासी लोकांच्या या अधिकारांमध्ये डोकावत नाहीत.
अनेक आदिवासी जमाती अशा काही रितीरिवाजांचं पालन करतात ज्याबाबत समजल्यावर लोक हैराण होतात. लग्न समारंभापासून ते मृत्यूपर्यंत अनेक विचित्र रिवाज पाळले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका जमातीबाबत सांगणार आहोत. या जमातीमध्ये लग्नानंतर नवरीला विचित्र पद्धतीने आशीर्वाद दिला जातो. या जमातीमध्ये लोक नवरीच्या डोक्यावर थुंकून तिला आशीर्वाद देतात.
ही जमात केनिया आणि तंजानियामध्ये राहते. या जमातीला मसाई म्हटलं जातं. जेव्हा या समाजात मुलीचं लग्न होतं तेव्हा पाठवणी करताना वडील नवरीच्या डोक्यावर आणि ब्रेस्टवर थुंकतात. असं सांगितलं जातं की, वडील अशाप्रकारे आपल्या मुलीला आशीर्वाद देतात. इथे वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आली आहे.
ही परंपरा म्हणजे वडिलांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मानली जाते. वडिलांच्या थुंकण्याला मुलीसाठी आशीर्वाद मानलं जातं. या समाजात मुलीकडील लोक मुलाकडील लोकांना हुंडा देतात. हैराण करणारी बाब म्हणजे इथे लग्नानंतर नवरीचं टक्कल केलं जातं.
यानंतर नवरी वडिलांसमोर गुडघे टेकवून परिवाराकडून आशीर्वाद घेते. यादरम्यान वडील नवरीच्या डोक्यावर आणि ब्रेस्ट थुंकतात. असं सांगितलं जातं की, हे नवरीसाठी शुभ असतं. यासोबतच नवजात बाळांसोबतही अशीच प्रथा पाळली जाते.
मसाई समाजातील लोक सांगतात की, थुंकणे सन्मानाची बाब आहे. या समाजात जेव्हाही कुणी पाहुणा येतो, तर त्यांच्या हातावर थुंकून त्यांचं स्वागत केलं जातं. तसेच लग्न झाल्यावर मुली मागे वळून बघत नाहीत. अशी मान्यता आहे की, असं केलं तर नवरी दगड बनते.