The story of amrapali life history of Nagarvadhu api
इतिहासातील सर्वात सुंदर महिलेला 'अशी' शिक्षा का मिळाली? वाचून व्हाल हैराण By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 03:22 PM2020-03-19T15:22:59+5:302020-03-19T15:28:24+5:30Join usJoin usNext आम्रपाली ही इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री मानली जात होती. आम्रपालीच्या सुंदरतेची तुलना कोणत्याही गोष्टीसोबत केली जाऊ शकत नव्हती. पण तिचं हे सौंदर्यच तिच्यासाठी दुर्दैवी ठरलं. आम्रपालीला लहान वयातच राज्याच्या आदेशावरून 'वेश्या' व्हावं लागलं होतं. कदाचित असं सोसावं लागलेली इतिहासातील एकुलती एक महिला असेल. एका सुंदर मुलीला नगरवधु आणि नंतर भिक्षुणी व्हावं लागलं. या प्रवासात अनेक मोठी नावे येतात. चला जाणून घेऊ आम्रपालीची ट्रॅजिक आणि दुख:द कहाणी..... प्राचीन भारतात इ.स.पू. ५०० मध्ये लिच्छवी गणराज्याची राजधानी वैशालीमध्ये एका गरीब जोडप्याला एका आंब्याच्या झाडाखाली एक मुलगी सापडली. आम्रपालीच्या आई-वडीलांचं नाव कुणाला माहीत नाही. ती एका आंब्याच्या झाडाखाली सापडली होती त्यामुळे तीचं नाव आम्रपाली ठेवलं होतं. पाली ग्रंथांमध्ये तिच्या सौंदर्याचा उल्लेख आढळून येतो. आम्रपाली इतकी सुंदर होती की, शहरातील प्रत्येक पुरूषाला तिच्यासोबत लग्न करायची इच्छा होती. पाली ग्रंथानुसार, राजापासून ते व्यापाऱ्यापर्यंत सगळेच आम्रपालीच्या प्रेमात होते. आम्रपालीसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव होते. त्यामुळे तिचे आई-वडील प्रश्नात पडले. जर आम्रपालीच्या आई-वडिलांनी कुण्या एका व्यक्तीची निवड केली असती तर शहरातील इतर लोक नाजार झाले असते आणि शहराची शांतता भंग झाली असती. पाली ग्रंथानुसार, वैशाली एका लोकशाही राज्य होतं. ज्यांची एक संसदही होती. या संसदेत आम्रपालीच्या विषयावर चर्चा झझाली. त्यांनी ठरवले की, वैशाली राज्याची एकता आणि शांतता राखण्यासाठी तसेच सर्वांच्या आनंदासाठी आम्रपालीला नगरवधू बनवण्यात यावे. आम्रपाली संपूर्ण नगराची नवरी झाली. आता तिला प्रत्येकावर प्रेम करायचं होतं. आम्रपालीला नगरवधू करून वैशालीतील लोक खूश झाले. पण अशाप्रकारे आम्रपाली तिच्या सुंदरतेची शिकार झाली. आम्रपालीला जनपथ कल्याणी अशी उपाधी देण्यात आली. हा किताब 7 वर्षांसाठी दिला जात होता आणि राज्यातील सर्वात सुंदर व प्रभावशाली महिलेला दिला जात होता. आम्रपालीला तिचा स्वत:चा महाल मिळाला. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जोडीदार निवडण्याचाही तिला अधिकार मिळाला. त्यानंतर ती दरबारातील नर्तकी झाली. मगध राजा बिम्बिसारचं वैशालीसोबत नेहमीच भांडण होतं. त्यामुळे आम्रपालीला भेटण्यासाठी त्यांना दुसरं रूप घ्यावं लागत होतं. बिंबिसार स्वत: एक संगीतकार होते. दोघे नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. आम्रपालीला त्याच्याकडून मुलही होतं. त्यांचा मुलगा पुढे जाऊन बौद्ध भिक्खु झाला. एकदा पुन्हा बिंबिसारने वैशालीवर आक्रमण केलं. त्यावेळी त्याने वैशालीच्या महालात शरण घेतली. त्यावेळीच आम्रपालीला बिंबिसारबाबत खरं माहिती झालं. आम्रपालीने त्याला युद्ध थांबवण्याची विनंती केली. पण त्याने नकार दिला. त्याने तिला मगधची महाराणी होण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, तिनेही त्याचा प्रस्ताव नाकारला. कारण तिने प्रस्ताव स्वीकारला असता तर मोठं युद्ध झालं असतं. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू सुद्धा आम्रपालीकडे आकर्षित झाला. आम्रपालीही त्याच्यावर प्रेम करू लागली होती. पण जेव्हा याबाबत वैशालीतील लोकांना समजलं तेव्हा तिला तुरूंगात टाकण्यात आलं. या गोष्टीने अजातशत्रू संतापला आणि त्याने वैशालीवर हल्ला केला. अनेक लोक मारले गेले. यामुळे आम्रपाली दु:खी झाली. तिचं तिच्या राज्यावर खूप प्रेम होतं. एकीकडे मोठमोठे व्यापारी, राजकुमार आम्रपालीच्या सुंदरतेवर भाळत होते. पण आम्रपाली एका बौद्ध भिक्क्षुकडे आकर्षित झाली. या बौद्ध भिक्क्षुला तिने जेवायला बोलवलं. त्यावर त्या भिक्क्षुने असं उत्तर दिलं की, तो हे त्याच्या गुरूच्या म्हणजे गौतम बुद्धांच्या आज्ञेनंतरच असं करू शकतो. गौतम बुद्धांनी सुद्धा भिक्क्षुला परवानगी दिली. 4 महिन्यांनी आम्रपाली बौद्ध भिक्क्षुसोबत आली आणि बुद्धांच्या चरणी पडली. आम्रपाली त्यावेळी जे बोलली ते ऐकून सगळेच हैराण झाले. आम्रपाली तेव्हा म्हणाली होती क, मी तुमच्या बौद्ध भिक्क्षुला मोहित करू शकले नाही. पण त्यांच्या आध्यात्माने मला त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले. (ही माहिती आचार्य चतरसेन शास्त्री यांची कादंबरी 'वैशालीची नगरवधु आणि बुद्धचरित्र, जातक कथेंवर आधारित आहे.)टॅग्स :इंटरेस्टींग फॅक्ट्सइतिहासजरा हटकेInteresting FactshistoryJara hatke