Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:35 PM2022-03-03T13:35:40+5:302022-03-03T13:49:38+5:30

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा जन्म १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता. एड्वर्ड हा त्याच्या दोन जुळलेल्या चेहऱ्यांसाठी ओळखला जात होता.

प्रत्येक व्यक्तीला दोन चेहरे असतात हे वाक्य तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. एक चांगला आणि एक वाईट. प्रत्यक्षात व्यक्तीला दोन चेहरे नसतात त्यांचं व्यक्तीत्व बदलत असतं. कधी कधी लोक रागात म्हणतात की, 'दाखवला ना तुझा खरा चेहरा'. मनुष्याच्या दोन चेहऱ्यांबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. यादरम्यान एक चेहरा खरा आणि दुसरा चेहरा दाखवण्यासाठी असतो.

दोन चेहऱ्यांचा विषय निघालाच तर आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याला खरंच दोन चेहरे होते. एका व्यक्तीचा एकाच शीरावर दोन चेहरे होते एक मागे आणि एक पुढे. तसं तर हे जरा विचित्रच वाटेल, पण हे सत्य आहे.

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा जन्म १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता. एड्वर्ड हा त्याच्या दोन जुळलेल्या चेहऱ्यांसाठी ओळखला जात होता. म्हणजे त्याच्या डोक्याच्या मागे एक चेहरा आणि समोर एक चेहरा. हैराण करणारी बाब म्हणजे त्याच्या दोन्ही चेहऱ्यावर दोन नाक, दोन कान आणि ४ डोळे होते. एडवर्डचा दुसरा चेहरा मोजकेच काम करू शकत होता. तो त्याच्या मागच्या चेहऱ्याने बघू शकत होता, पण काही खाऊ-पिऊ शकत नव्हता. तसेच बोलूही शकत नव्हता.

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा मागचा चेहरा डोळ्यांनी बघू शकत होता. पण जेव्हा समोरचा चेहरा हसत किंवा रडत होता तेव्हा मागचा चेहराही तसाच करू लागत होता. एडवर्ड जेव्हाही झोपण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा दुसरा चेहरा त्याला जागी ठेवण्यासाठी कानात काहीतरी फुसफुस करत होता. त्यामुळे तो झोपू शकत नव्हता.

एडवर्डला लोक एविल ट्विन म्हणत होते. याचा अर्थ ज्याला दोन तोंड आहेत. एडवर्डच्या या समस्येसाठी कुटुंबिय त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. पण मोठी मेहनत करूनही डॉक्टर यावर काही उपाय करू शकले नाहीत. एडवर्ड अशाप्रकारचा एकुलता एक व्यक्ती नव्हता. अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत. ज्या विज्ञानासाठी आव्हान आहेत.

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा स्वभाव फारच मनमिळावू होता. पण तरीही लोक त्याला पसंत करत नव्हते. खासकरून लहान मुलं त्याला बघून घाबरत होते आणि काही लोक तर त्याला चिडवत होते. एडवर्डने आपल्या या समस्येला वैतागून वयाच्या २३व्या वर्षी आत्महत्या केली. त्यावेळी त्याच्या आत्महत्येची चर्चा जगभरात झाली होती.

एडवर्डच्या एकाच डोक्यावर दोन चेहरे असले तरी त्याला मेंदू एकच होता आणि त्याची विचार करण्याची, समजण्याची शक्तीही एकच होती. १८व्या शतकात अशाप्रकारच्या केसेसनी डॉक्टरांना विचारात पाडलं होतं. काही लोक असंही म्हणत होते की, एडवर्डची कहाणी रिअल नाही. त्याला एक कॅरेक्टर म्हणून बनवण्यात आलं होतं.