कुठे दंड, तर कुठे फाशी! हे आहेत खाद्यपदार्थांशी संबंधित अजब कायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:44 PM2018-12-24T15:44:29+5:302018-12-24T16:16:57+5:30

जगभरात सर्वत्र नियमांचं पालन करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र काही देशात खाद्यपदार्थांबाबत अजब कायदे आहेत. नियम न पाळल्यास तसेच चूक केल्यावर दंड तर काही ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. अशाच काही अजब कायद्यांबाबत जाणून घेऊया.

एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण झाल्यानंतर त्याचं बील भरलं जातं. मात्र डेन्मार्कमधील हॉटेलमधील ग्राहकांचं खाण्यामुळे आणि सर्विसमुळे जोपर्यंत समाधान होत नाही तो पर्यंत त्यांना पैसे देण्याची परवानगी नाही.

Louisiana मध्ये जर तुम्ही पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर घरी नसलात तर 500 डॉलर म्हणजेच 35,417 रुपये दंड भरावा लागतो.

कॅलिफोर्नियामध्ये पक्ष्यांना बागेत अथवा इतर ठिकाणी एकत्र करून खाण्यासाठी दाणे टाकल्यास दंड भरावा लागतो.

Bolivia च्या LaPaz मध्ये विवाहित महिलांना एका ग्लासापेक्षा अधिक वाईन पिण्याची परवानगी आहे.

कॅलिफोर्नियाच्या बाथटबमध्ये संत्र खाणं बेकायदेशीर आहे. मात्र अशा स्वरुपाचा कायदा कोणी आणि कधी तयार केला याबाबत कोणतीही माहिती नाही.

El Salvador मध्ये दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हा असून यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे.

थायलंडमध्ये च्यूइंगम कुठेही थुंकण्यास मनाई आहे. ही चूक केल्यास 600 डॉलर म्हणजेच 42,573 रुपये दंड भरावा लागेल.

टॅग्स :अन्नfood