strangest fruits popular in china amid dragon fruit controversy
चीनमधील 'ही' फळं दिसायला आहेत विचित्र, तरीही लोक आवडीनं खातात... By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 01:35 PM2021-01-27T13:35:31+5:302021-01-27T13:44:58+5:30Join usJoin usNext चिनी वस्तूंच्या बंदीमध्ये एक नाव सतत चर्चेत असते, ते म्हणाजे ड्रॅगन फ्रूट. हे फळ नावाने मूळचे चिनी असल्याचे वाटते. त्यामुळे या फळाचे नाव भारतात बदलले गेले आहे. कमळासारखे दिसल्यामुळे ड्रॅगन फ्रूटला आता कमलम म्हटले जाईल. खरंतर ड्रॅगन फ्रूट हे मूळचे अमेरिकेचे आहे. मात्र, चीनमध्ये त्याचे बरेच उत्पादन होते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट जास्त असल्याचे पाहायला मिळते. अशीच काही फळे चीनमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याविषयी जाणून घ्या... ड्युरियन (Durian) फळ हे चीनमधील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे जगातील सर्वात दुर्गंधीयुक्त फळ आहे. तरिही त्याला फळांचा राजा म्हणतात. परदेशी लोकही चीन किंवा इंडोनेशियासारख्या देशांत गेल्यावर त्यासोबत सेल्फी घेतात. खरंतर ड्युरियनचा वास इतका खराब आहे की, ते बहुधा फळांच्या दुकानात काचेच्या बॉक्समध्ये स्वतंत्रपणे ठेवले जाते. हे सर्वात महाग फळांपैकी एक आहे. ड्रॅगन फ्रूट (Dragonfruit) या फळाची सध्या भारतात जास्त प्रमाणात चर्चेत तयार केले जाते, चीन व्यतिरिक्त ते अमेरिका, कॅरिबियन, ऑस्ट्रेलिया येथे घेतले जाते. आता गुजरातमध्येही याची लागवड केली जात आहे. या फळाचे नाव ड्रॅगन फ्रूट हे त्याच्या रचनेमुळे पडले. वास्तविक, ड्रॅगनप्रमाणे त्यावर काटे आहेत. खरंतर, वेगवेगळ्या देशांमध्ये याची अनेक विविध नावे आहेत, जसे की पिटाया रोजा किंवा स्ट्रॉबरी पियर. हे फळ गोड आणि आतून पाण्याने भरलेले असते. रामबुतान (Rambutan) हे एक फळ आहे. हे खूप वेगळे फळ आहे. त्याचे बाह्य कवच एखाद्या प्राण्यासारखे दिसते. त्याच्या विचित्र स्वरूपामुळे बरेच लोक ते खाऊ इच्छित नाहीत, मात्र आतून रामबुतान हे लीचीसारखे गोड आणि चवदार आहे. चीनमधील लोक ते नियमितपणे खातात. यामुळे त्वचा तजेलदार होते, असे येथील लोक मानतात. रामबुतान सारखेच बेबेरी (Bayberry) फळाचे आवरण देखील विचित्र आहे. मात्र, खाण्यासाठी बेबेरी कोणत्याही गोड फळासारखे असते. त्याचा वास देखील सौम्य आहे आणि ते फार महाग फळही नाही. त्यामुळे चीनमध्ये या फळाला बरीच मागणी आहे. तसेच, हे फळ त्वरीत खराब होते, त्यामुळे ते पिकल्यानंतर लगेच खावे लागते. मँगोस्टीन (Mangosteen) हे देखील एक फळ आहे, जे चीनमध्ये मोठ्या उत्साहाने खाल्ले जाते. याला फळांची राणी म्हणतात. या फळाची चव थोडी आंबट आणि गोड आहे. आंब्यासारखे ऐकले जाणारे हे फळ आंब्यासारखे नसून सोलल्यानंतर आत पांढर्या रंगाचा पल्प दिसतो. काही कारणास्तव अमेरिकेत या फळावर बंदी आहे. पर्सिमॉन (Persimmon) हे देखील चीनचे फळ मानले जाते. मात्र त्याच्या उत्पत्तीबद्दल बर्याच गोष्टी आहेत. जसे काही लोक म्हणतात की, हे फळ मूळतः पर्शियातून आले असावे आणि चीनने ते काढून घेतले. पण, अंजीरासारखे दिसणारे हे फळ खाणे कच्च्या मांसासारखे वाटते, म्हणून शाकाहारी लोकांना ते खायला आवडत नाही. तसे, हे फळ उकडून देखील खाल्ले जाते. एक फळ म्हणजे पॉमेलो (Pomelo) जे संत्रासारखे दिसते. हे लिंबूवर्गीय फळासारखे आहे, परंतु ते खूप मोठे आहे. हे खायला इतकी मजा नसली तरी चीनमध्ये व्हिटॅमिन सीचा पर्याय म्हणूनही खाल्ले जाते. पॉमेलो खाल्यामुळे घरात समृद्धी येते, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. यामुळे चिनी लोक एकमेकांना हे फळ नवीन वर्षाची भेट म्हणून देतात. गोजी बेरी (Goji Berries) हे लाल रंगाचे फळ आहे, जे प्रामुख्याने चीनमध्ये आढळते. भारतातही हिमालयच्या पायथ्याशी त्याची लागवड केली जात आहे. या फळामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे ते चीनच्या सीमेपलिकडे सर्वत्र आढळू लागले आहे. गोड मनुकासारखे दिसणारे हे फळ दोन हजार वर्षांहून अधिक काळ चीनमध्ये पारंपारिक औषधात आहे.Read in Englishटॅग्स :फळेचीनfruitschina