strangest trees from around the world
अजब झाडांपासून साकारलं असं काही की विश्वासच बसणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:45 PM2019-04-25T17:45:06+5:302019-04-25T18:01:51+5:30Join usJoin usNext जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत. मात्र ठिकाणांप्रमाणेच काही अजब झाडं ही जगभरात पाहायला मिळतात. अशाच काही अजब झाडांविषयी जाणून घेऊया. वावोना ट्री अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका झाडामधून बोगदा तयार करण्यात आला होता. 227 फूट लांब असलेले हे झाड 1969 मध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे खाली कोसळले. मात्र आता अनेक प्राण्यांनी या जागी आसरा घेतला आहे. सनलँड बोआब ट्री सनलँड बोआब हे झाडाची लांबी ही 72 फूट तर रुंदी 155 फूट आहे. दक्षिण अफ्रिकेतील मोडजाडजिसक्लूफ (Modjadjiskloof) मध्ये हे झाडं आहे. 1933 मध्ये या झाडाच्या आत एक बार सुरू करण्यात आला होता. त्यावेळी फक्त 15-20 माणसं आत बसू शकत होती. मात्र आता 60 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.ड्रॅगन्स ब्लड ट्री उत्तर-पश्चिम अफ्रिकेच्या कॅनरी बेटावर ड्रॅगन्स ब्लड ट्री आहेत. एक ड्रॅगन मेल्यानंतर त्याचं झाड झालं असं या ठिकाणी मानलं जातं. या झाडाच्या खोडातून रक्ताच्या रंगासारखे एक विशिष्ट द्रव्य बाहेर पडते. त्यामुळेच या झाडाला ड्रॅगन्स ब्लड ट्री असं म्हटलं जातं. सिल्क कॉटन ट्री सिल्क कॉटन ट्री हे कंबोडियातील एक प्रसिद्ध प्राचीन मंदिरावर असलेलं झाड आहे. याच्या फांद्या वर्षानुवर्षे वाढत असल्याने आजुबाजूचा परिसर सुंदर दिसत आहे. बोआब ट्री ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट डर्बी शहरात एक मोठे बोआब ट्री नावाचे झाड आहे. मात्र या झाडामध्ये एक जेल तयार करण्यात आले असून कैदयांना ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. क्रूक्ड फॉरेस्ट पोलंडमधील ग्राइफिनो शहरात विचित्र आकाराची 400 झाडं आहेत. या झाडांकडे रहस्य म्हणून पाहिले जाते. बॉटल ट्री बॉटल ट्री हे जगभरातील धोकादायक झाडांपैकी एक असून नामिबियामध्ये ही झाडं आहेत. बॉटलसारखी ही झाडं असल्याने त्यांना बॉटल ट्री असं म्हटलं जातं. इंद्रधनुषी यूकलिप्टस इंद्रधनुषी यूकलिप्टस हे झाडं फिलिपीन्समध्ये आहे. या झाडाचे खोड हे रंगीबेरंगी आहे. कागद तयार करण्यासाठी या झाडाचा वापर केला जातो. टॅग्स :जरा हटकेJara hatke