'या' राजाकडे आहे जगातील सगळ्यात मोठं कार कलेक्शन, किती आहे वाचाल तर चक्रावेल डोकं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 14:37 IST2024-12-20T14:21:35+5:302024-12-20T14:37:51+5:30

Sultan of Brunei cars collection : ब्रुनेईचा सुलतान हसनल बोलकिया याच्या कार कलेक्शनमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त कार आहेत. ज्या ठेवण्यासाठी त्यांच्याकडे अनेक गॅरेजही आहेत.

Sultan of Brunei Net Worth: ब्रुनेईचा सुलतान नेहमीच त्याच्या कार कलेक्शनसाठी चर्चेत असतो. कारण त्याच्या कार कलेक्शनमध्ये ६०० रोल्स-रॉयस, ४५० फरारी आणि ३८० बेंटले कार्सचा समावेश आहे. त्याशिवाय पोर्श, लॅम्बॉर्गिनी, मेबॅक, जगुआर, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि मॅकलेरेंससारख्या लक्झरी कारचा समावेश आहे.

ब्रुनेईचा सुलतान हसनल बोलकिया याच्या कार कलेक्शनमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त कार आहेत. ज्या ठेवण्यासाठी त्यांच्याकडे अनेक गॅरेजही आहेत. सोन्याचा मुलामा असलेल्या, हिरेजडीत कारही त्यांच्याकडे आहेत. सगळ्यात जास्त कार कलेक्शनसाठी सुलतानाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे.

ब्रुनेईचे सुलतान यांच्या या प्रायव्हेट कार कलेक्शनची किंमत साधारण ५ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार ४१ हजार कोटीपेक्षाही आहे. तेच ब्रुनेई सुलतानची एकूण संपत्ती ३० अब्ज डॉलर इतकी आहे. देशातील तेल आणि गॅस भांडारातून ही कमाई केली गेली.

ब्रुनेईच्या सुलतानाकडे केवळ कार कलेक्शनच नाही तर प्रायव्हेट जेट कलेक्शनही आहेत. त्यांच्याकडे बोईंग ७४७-४००, बोईंग ७६७-२०० आणि एअरबस A३४०-२०० यांचा समावेश आहे. या जेट विमानांना सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे. कथितपणे या गोल्ड प्लेटेड विमानांची किंमत ४,३०० कोटी रूपये आहे. ज्यात सोन्याचं वॉश बेसिन, सोन्याच्या भिंती आणि सोन्याच्या धाग्यांनी विणलेले गालिचे आहेत.

सुलतान हसनल यांचा महालही भव्य आणि आलिशान आहे. त्यांच्या इस्ताना नूरुल ईमान नावाच्या या महालाचं नावही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेलं आहे. १९८४ मध्ये २० लाख वर्ग फूट जागेत बांधलेला हा महाल जगातील सगळ्यात मोठा महाल असल्याचं बोललं जातं.

महालात अनेक ठिकाणी सोन्याचा वापर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी हिरे लावण्यात आले आहेत. या महालाची अंदाजे किंमत २.२५० कोटी रूपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. ब्रुनेई यांच्या या महालात १,७०० रूम, २५७ बाथरूम, ५ स्वीमिंग पूल आणि ११० गॅरेज आहेत.

ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया यांच्या संपत्ती प्रमाणेच त्यांची खासगी जीवनही नेहमीच चर्चेत असतं. त्यांना तीन पत्नी, ५ मुले आणि ७ मुली आहेत. त्यांचं पहिलं लग्न १९६५ मध्ये पेंगिरन अनक हजाह सालेहासोबत झालं होतं. नंतर त्यांनी १९८१ मध्ये मरियम अब्दुल अजीज आणि २००५ मध्ये अजरीनाज मजहरसोबत लग्न केलं. कथितपणे मरियम आणि अजरीनाजसोबत त्यांचा २००३ आणि २०१० मध्ये घटस्फोट झाला होता.