अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 11:24 AM 2020-07-31T11:24:33+5:30 2020-07-31T11:40:34+5:30
एलियनसारख्या दिसणाऱ्या या जीवाचं नाव आहे ओशन सनफिश. ही फिश शोधली कॅथ रॅम्पट्स आणि त्यांचे पती टॉम यांनी. एका आकाराने मोठा, दुर्मिळ आणि विचित्र जीव ऑस्ट्रेलियाच्या समुद्र तटावर आढळून आला आहे. हा जीव पाहून येथील पर्यटक हैराण झाले आहेत. या जीवाची चेहरा एलियनसारखा दिसत असल्याचा दावा केला आहे. हा जीव ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया प्रांतातील दक्षिण-पश्चिम तटावर आढळून आला.
एलियनसारख्या दिसणाऱ्या या जीवाचं नाव आहे ओशन सनफिश. ही फिश शोधली कॅथ रॅम्पट्स आणि त्यांचे पती टॉम यांनी. ते या बीचवर सुट्टी एन्जॉय करत होते. दोघेही प्राण्यांचे डॉक्टर आहेत. दोघांनी सांगितले की, त्यांनी याआधी कधीही असा जीव पाहिला नाही.
डेली मेल ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वृत्तानुसार, कॅथ रॅम्पट्नने सांगितले की, हा मासा साधारण २ मीटर लांब आणि तेवढाच उंच होता. पण माहिती समोर आली की, हा त्याच्या प्रजातीचा छोटा मासा आहे. या प्रजातीमध्ये यापेक्षा दुप्पट आकाराचे मासे असतात.
हा मासा नंतर पर्यटक टूरिस्ट टिम रॉथमॅन आणि जेम्स बरहॅमने पाहिला. या दोघांनीही सांगितले की, हा मासा पूर्णपणे एलियनसारखा दिसतो. ते म्हणाले की, याआधी त्यांनीही कधी असा जीव पाहिला नव्हता. दरम्यान गेल्यावर्षी दक्षिण ऑस्ट्रेलियात एका मच्छिमाराने सनफिशला पकडलं होतं.
एक वयस्क सनफिश ३ मीटर लांब, ४.२ मीटर उंच आणि साधारण २.५ टन वजनी असू शकतो. हा मासा हल्लाही करू शकतो. सोबत दिसायलाही आकर्षक असतो. त्यामुळे त्यांना एक्वेरिअममध्ये ठेवलं गेलंय.
माशांचे तज्ज्ञ राल्फ फोस्टर यांनी सांगितले की, एखाद्या मोठ्या जहाजाने धडक दिली असेल तेव्हाच हा मासा तटावर आला असेल. तो जखमी असेल. अनेक हे मासे प्लास्टिकच्या पिशव्या जेलीफिश समजून खातात. याने ते मरतात.
राल्फ फोस्टर सांगतात की, हे मासे नेहमीच दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या समुद्री तटावर बाहेर येतात. पण हे मासे जास्तीत जास्त समुद्रात खोलवर राहतात. जपान, कोरिया, तायवानसारख्या देशात हा मासा खाल्ला जातो.