...म्हणून मधमाशांसाठी मॅक्डॉनल्डनं उभारलं रेस्टॉरंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:19 PM2019-05-27T15:19:26+5:302019-05-27T15:44:05+5:30

मधमाशांची प्रजाती गेल्या काही वर्षांपासून धोक्यात आहे. त्यांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे. (सर्व फोटो - www.beautifullife.info)

स्वीडनमध्ये मधमाशांसाठी McDonald’s चं एक खास मिनी आउटलेट तयार करण्यात आलं आहे.

McDonald’s च्या या सर्वात छोट्या आउटलेटला McHive म्हटलं जातं.

अनेक झाडं असलेल्या एका गवताच्या मैदानात खास मधमाशांसाठी हे आउटलेट तयार करण्यात आले आहे.

McDonald’s ने एका प्रोफेशनल डिझायनरकडे या आउटलेटच्या डिझाईनची जबाबदारी दिली होती.

मधमाशांसाठी आवश्यक असणारं पोषक वातावरण लक्षात ठेवून हे रेस्टॉरंट तयार करण्यात आलं आहे.

स्वीडनच्या McDonald’s चे मार्केटिंग डायरेक्टर Christoffer Rönnblad यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आतापर्यंतचे सर्वात यूनिक क्रिएशन आहे. त्यामुळे मधमाशांना त्यांचं घर तयार करताना कोणतीही अडचण येणार नाही.

ईयू म्हणजेच यूरोपीय संघाने Neonicotinoids वर बंदी घातली आहे. मधमाशांना याचा धोका अधिक असतो.

झाडांवर Neonicotinoids फवारल्यामुळे मधमाशा जेव्हा पानांवर बसतात. तेव्हा त्यांचा मृत्यू होतो.

स्वीडनमध्ये मधमाशांना मानवी धोक्यापासून वाचवण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे.