समुद्रात पोहत तो सात हजार किमी लांब मक्केला निघाला, पाण्यात उडीही घेतली आणि मग... By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 11:42 AM 2021-08-09T11:42:06+5:30 2021-08-09T11:49:13+5:30
Jara hatke News: मक्केला जाण्यासाठी एका व्यक्तीने जे काही केले ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मलेशियापासून सुमारे ७ हजार किमी लांब असलेल्या मक्केला समुद्रातून पोहत जाण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला. मक्का हे इस्लाममधील अत्यंत पवित्र स्थळ आहे. मक्केला भेट देणे हे प्रत्येक मुस्लिमाचे स्वप्न असते. दरम्यान, मक्केला जाण्यासाठी एका व्यक्तीने जे काही केले ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मलेशियापासून सुमारे ७ हजार किमी लांब असलेल्या मक्केला समुद्रातून पोहत जाण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला.
दरम्यान, या व्यक्तीला मलेशियन पोलिसांनी वाचवले आहे. मलेशियापासून मक्केपर्यंतचे अंतर हे ७ हजार किमी आहे. एवढे अंतर पोहत कापण्याच्या प्रयत्नात असलेल्या या २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. तसेच त्याची मनोस्थिती तपासण्यासाठी त्याची रवानगी मनोरुग्णालयात केली.
मलेशियामध्ये सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सदर तरुणाला रुग्णालयात नेण्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. मक्केपर्यंत पोहत जाण्याचे आपले लक्ष्य असल्याचे या तरुणाने सांगितले होते.
गेल्या तीन आठवड्यात दुसऱ्यांदा त्याने असा प्रयत्न केला होता. मात्र हा तरुण मलेशियातून हजारो किमी लांब असलेल्या मक्केला पोहत जाण्याच्या प्रयत्न का करत होता, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलिसांनी सांगितले की, या तरुणाची ड्रग्स टेस्टसुद्धा करण्यात आली. मात्र ती निगेटिव्ह आली. तर याच तरुणाने १२ जुलै रोजी याच ठिकाणाहून मक्केला जाण्यासाठी समुद्रात उडी मारली.
पोलिसांनी सांगितले की,लांब पल्ल्याच्या जलतरणासाठी पहिल्या प्रयत्नानंतर या तरुणाला मनोरुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. तपासामध्ये त्याला मानसिक समस्या असल्याचे समोर आले.