Teachers day funny excuses students give when homework is incomplete
Teachers’ day: गृहपाठ अपूर्ण असताना शिक्षकांना दिली जाणारी पाच कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:17 PM2018-09-05T15:17:22+5:302018-09-05T15:21:15+5:30Join usJoin usNext अभ्यास केला; पण वही विसरलो: गृहपाठ केला नसेल, तर हे कारण हमखास दिलं जायचं. खरंतर शिक्षकांनादेखील माहित असायचं की विद्यार्थ्यानं अभ्यास केलेला नाही. मात्र तरीही हे कारण सांगून वेळ मारुन नेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असायचा. मित्रानं वही घेतली: मी अभ्यास केला होता. पण शेजारी राहणाऱ्या मुलानं वही घेतली. तोदेखील माझ्याच इयत्तेत आहे. मात्र तो आपल्या शाळेत नाही, असंही कारण विद्यार्थ्यांकडून दिलं जातं. वही बदली झाली: मी अभ्यास केला होता. मात्र बॅग भरताना भाऊ/बहिणीसोबत वह्यांची अदलाबदल झाली. शाळेत येऊन पाहिलं, तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. वही भिजली: गृहपाठ केला होता. पण वही भिजल्यानं आणता आली नाही. वही सुकायला ठेवली आहे. उद्या नक्की आणतो. मला बरं नव्हतं: मला ताप आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. तब्येत बरी वाटली म्हणून आज शाळेत आलो. बरं वाटत नव्हतं. त्यामुळे आराम केला, म्हणून अभ्यास राहिला. टॅग्स :शिक्षक दिनशिक्षकविद्यार्थीTeachers DayTeacherStudent