बाबो! ४७ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली १९ वर्षीय तरूणी, आता रोमान्ससाठी शिक्षण सोडायलाही तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:10 PM2021-08-11T13:10:06+5:302021-08-11T13:14:32+5:30

सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली आणि आता आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी तरूणी आपलं शिक्षण सोडण्यास तयार आहे.

कोरोना महामारीमुळे लोक अनेक महिन्यांपासून घरात बंद होते. अशात त्यांनी खाण्या-पिण्याच्या एक्सपरिमेंट्ससोबत नात्यांमध्येही अनेक एक्सपरिमेंट्स केले. आता विचार करा की, १९ वर्षाची तरूणी ४७ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात कशी पडेल?

अशाच एका कपलची सध्या चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली आणि आता आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी तरूणी आपलं शिक्षण सोडण्यास तयार आहे.

१९ वर्षीय चार्लिन चॅल्टिनची भेट ४७ वर्षीय जेरेमी प्रॅक्टिकोसोबत २०२० मध्ये झाली. ते फेसबुकच्या एक फॅन पेजवर भेटले होते. इथूनच त्यांचा चॅटींगचा सिलसिला सुरू झाला.

ते इतके जवळ आले की, चार्लिन आपला देश सोडून अमेरिकेला केवळ जेरेमीसोबत राहण्यासाठी जाण्याच्या तयारीत आहे. तिच्यानुसार, तिच्या आयुष्यात जेरेमीच तिची प्राथमिकता आहे. २८ वर्ष वयाचं अंतर असूनही कपल एकमेकांबाबत फार सिरीअस आहे.

जेरेमी प्रॅक्टिको अमेरिकेतील वर्मोंटमध्ये राहतो. तर चार्लिन बेल्जिअमच्या ब्रसेल्समध्ये राहते. महामारी दरम्यान दोघांच्या रोमान्सला सुरूवात झाली. तेही ऑनलाइन.

जेरेमी एलिमेंटरी स्कूलमध्ये टीचर आहे. जेव्हा त्यांनी चॅंटीग सुर केलं तेव्हा चॅंट्सचा सिलसिला वाढत गेला. क्वारंटाइनमुळे त्यांचं प्रेम फुललं. दोघांकडेही तेव्हा वेळ होता.

एवढ्यावरच त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. जेरेमी सांगतो की, तो त्याच्या वयाच्या तुलनेत कमी मच्योर आहे. तर चार्लिन तिच्या वयापेक्षा जास्त मच्योर आहे. त्यामुळे त्यांची जोडी जमत आहे.

४७ वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमात पडलेल्या चार्लिनचं मत आहे की, तिला जेरेमी कधीही मोठा वाटत नाही. चार्लिनने आई-वडिलांना जेव्हा तिच्या प्रेमाबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी असाही विचार केला की, चार्लिन हे केवळ ग्रीन कार्डच्या लालसेपोटी करत आहे.

एका वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये कोरोनामुळे कपल एकमेकांना भेटूही शकलं नाही. नुकताच जेरेमी ब्रसेल्सला आला होता तेव्हा त्यांनी सोबत ८ दिवस घालवले. आता चार्लिनला लवकरात लवकर जेरेमीसोबत अमेरिकेत शिफ्ट व्हायचं आहे.

Read in English