Temple of royal enfield bullet 350 in rajasthan om banna dham or bullet baba temple
'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 06:41 PM2020-07-03T18:41:58+5:302020-07-03T18:52:21+5:30Join usJoin usNext आत्तापर्यंत भारतातील अनेक देवी देवतांच्या मंदिराबाबत तुम्ही ऐकून असाल. अगदी माहीत नसलेल्या देवांची मंदीर सुद्धा ऐकून माहित असतात. काही मंदिरात पाण्याने दिवे लावले जातात अशी खासियत असते. तर कुठे आणखी काहीतरी नवीन संकल्पना असते. आज आम्ही तुम्हाला अशाच आगळ्या वेगळ्या मंदिराबाबत सांगणार आहोत. राजस्थानमध्ये एक असं मंदिर आहे. ज्या ठिकाणी रॉयल एनफील्ड बुलेट 350 ची पुजा केली जाते. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील लोक सुख, समृद्धी आणि सुरक्षेची प्रार्थना करतात. या मंदिराचे नाव ओम बन्ना धाम उर्फ बुलेट बाबा मंदिर असे आहे. बुलेट बाबा मंदीर NH-62 जोधपुरच्या पाली एक्सप्रेस हायवेवर आहे. जोधपूर पासून जवळपास ५० किमी आणि पालीपासून जवळपास २० किमी अंतरावर आहे. बाईकची पुजा केली जाते असं हे मंदिर ओम बन्ना यांना समर्पित केले आहे. फायन्सशियल एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये राजपूत नवयुवकांना बन्ना असं म्हणतात. ओम बन्ना यांचे पुर्ण नाव ओम सिंह राठोड असे होते. जवळपास 30 वर्षांपूर्वी ओम सिंह राठोड याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह आणि बाईक दोन्ही ताब्यात घेतले होते. पण, दुसऱ्या दिवशी बाईक पोलीस स्थानकातून दिसेनाशी झाली. ज्यावेळी पोलिसांनी बाईकचा शोध घेतला. तेव्हा ती बाईक ज्या ठिकाणी अपघात झाला होता. त्या ठिकाणी उभी होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा ती बाईक पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पण, दुसऱ्या दिवशी पुन्हा बाईक अपघाताच्या ठिकाणी आढळून आली. हा प्रकार अनेक दिवसांपर्यंत सुरू होता. त्यामुळे पोलीस घडणाऱ्या प्रकारामुळे गोंधळले होते. म्हणून पोलिसांनी एके दिवशी ही बाईक बांधून ठेवली आणि तिच्यावर नजर ठेवली. पण त्या रात्री जे घडले ते पाहून पोलिसांची चांगलेच बुचकळ्यात पडले. बाईक आपोआप सुरू झाली आणि पोलीस स्टेशनमधून बाहेर पडली. त्यानंतर ती पुन्हा अपघातग्रस्त ठिकाणी जाऊन पोहोचली. हा सगळा प्रकार पाहून पोलीस अवाक् झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी राठोड कुटुंबाकडे ही बाईक परत केली. ओम राठोड यांचा ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे बाईक जात असल्याचे पाहून ओम राठोडच्या वडिलांनी त्या ठिकाणी ओम बन्ना धाम नावाने मंदिर उभारले. या मंदिराला बुलेट बाबा मंदिर सुद्धा म्हटले जाते. या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी हे या मंदिरात थांबून पुढील प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना करतात. त्यानंतर पुढे मार्गस्थ होतात.टॅग्स :जरा हटकेसोशल व्हायरलJara hatkeSocial Viral