There is a money tree
खरोखरचं पैशाचं झाड पाहिलंय का?; चला, आम्ही घेऊन जातो! By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 05:37 PM2019-01-05T17:37:06+5:302019-01-05T17:44:10+5:30Join usJoin usNext अनेकदा पैशांबाबत होणाऱ्या चर्चांमध्ये, पैसे काय झाडाला लागतात का? असा प्रश्न आपण सर्रास ऐकतो. पण एक झाड असं आहे, ज्यावर खरोखरचं पैसे लागले आहेत. अहो खरं सांगतोय.... या झाडावर चक्क पैसे लागले आहेत. ब्रिटनमधील पीक डिस्ट्रिकमध्ये असलेलं हे झाड जवळपास 1700 वर्ष जुनं आहे. पण या झाडावर पैसे लागले आहेत हे खरं असलं तरिही पैसे उगवलेले मात्र नाहीत. हे झाड पाहण्यासाठी वेगवेगळ्या देशांमधील पर्यटक येथे येत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, झाडावर पैसे उगवलेले नाहीत मग पैसे कसे लागले आहेत? वेल्सत्या पोर्टनेरियन गावामध्ये असलेलं हे झाड एक प्रसिद्ध टूरिस्ट सपॉट बनला आहे. ज्यावर लोकं नाणी लावत असतात. या झाडावर कोणतीही अशी जागा शिल्लक नाही की, जिथे नाणी लावता येऊ शकतात. खास गोष्ट म्हणजे, येथे फक्त ब्रिटनच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांची नाणी लावण्यात आली आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला असेल की, या झाडावर एवढी नाणी का लावली आहेत? खरं तर या झाडाशी लोकांच्या अनेक भावना आणि श्रद्धा जोडलेल्या आहेत त्यामुळे या झाडावर नाणी लावली जातात. अनेक लोकांचा असा समज आहे की, झाडावर अशी नाणी लावल्यामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. तसेच अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की, या झाडामध्ये एखादी अद्भूत शक्ती आहे. ख्रिसमसच्या दिवशी या झाडाजवळ मिठाई आणि गिफ्ट्स ठेवले जातात. येथे अनेक जोडपी आपल्या नाताच्या आयुष्यासाठी झाडावर नाणी लावतात. सर्वात खास गोष्ट म्हणजे, या झाडावर लावली जाणारी नाणी फक्त यूकेमधीलच नसतात. तर येथे जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील नाणी लावण्यात आलेली आहेत. टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाआंतरराष्ट्रीयजरा हटकेSocial ViralSocial MediaInternationalJara hatke