'ही' आहेत पृथ्वीवरील 6 गुप्त ठिकाणे, गूगल मॅपवर शोधूनही दिसणार नाहीत; जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:40 PM2021-09-08T18:40:56+5:302021-09-08T18:44:19+5:30

Secret places on Earth: तुम्ही गूगल मॅपवर ही ठिकाणे शोधलीत, तर तुम्हाला त्यातील अर्ध्याहून अधिक भाग अस्पष्ट दिसेल.

नवी दिल्ली: गूगल मॅपच्या मदतीने कुठेही जाणे सोपं झालं आहे. जगाच्या पाठिवर तुम्ही कुठेही जा, गूगल मॅपची मदत घेऊन तुम्ही योग्य ठिकाणी पोहचू शकता. गूगल मॅपच्या मदतीने जगातील जवळपास प्रत्येक ठिकाणाची माहिती तुम्हाला मिळते. पण, पृथ्वीवर अशी काही ठिकाणे आहेत, जी गूगल मॅपवरही तुम्हाला दिसणार नाहीत. काही कारणास्तव ही ठिकाणं नकाशावर अस्पष्ट किंवा पिक्सेलेटेड हेत.

Cattenom न्यूक्लियर पॉवर प्लांट, फ्रांस-Cattenom Nuclear Power Plant जगातील 9वा न्यूक्लियर पॉवर स्टेशन आहे. हे लक्झेंबर्ग शहराजवळील ग्रँड एस्टमध्ये आहे. हा परिसर तुम्हाला गुगल मॅपवर पिक्सेलेटेड दिसेल.

Kos इंटरनॅशनल एअरपोर्ट, ग्रीस-हा परिसर Kos आयलँडवर असून, तुम्हाला ही जागा गूगल मॅपवर दिसणार नाही. हे एअरपोर्ट चार्टर एअरलाइंससाठी आहे. गर्मीच्या सीझनमध्ये हे विमानतळ सर्वात अॅक्टीव्ह असतं.

Amchitka आयलँड, अलास्का- जर तुम्ही गुगल मॅपवर हे बेट सर्च केले तर, तुम्हाला त्यातील अर्ध्याहून अधिक भाग अस्पष्ट दिसेल. रेकॉर्ड्सनुसार 1950 च्या दशकात अमेरिकन अणुऊर्जा आयोगाने भूमिगत अणुचाचण्यांसाठी या ठिकाणाची निवड केली होती. येथे 3 भूमिगत अणुचाचण्या करण्यात आल्या आहेत.

Jeannette आयलँड, रशिया-तुम्ही Google वर Jeannette Island Russia टाइप केल्यास तुम्हाला स्क्रीनवर काहीही दिसणार नाही. पूर्व सायबेरियन समुद्रात स्थित हे ठिकाण तुम्ही शोधू शकत नाही. हे ठिकाण रशियाचे लष्करी तळ असण्याचा अंदाज आहे.

Marcoule न्यूक्लियर साइट, फ्रांस-तुम्हाला गुगल मॅपवर मार्कॉल न्यूक्लियर साइट पाहायची असेल, तर तुम्हाला ती दिसणार नाही. तुम्हाला हा संपूर्ण परिसर पिक्सेलेटेड दिसेल. अहवालानुसार, हे फ्रेंच सरकारच्या आदेशावरून करण्यात आले आहे. हा परिसर फ्रान्समधील सर्वोच्च आण्विक संशोधन सुविधांपैकी एक आहे.

Moruroa आयलैंड, French Polynesia-तुम्हाला गूगल मॅपवर हे बेट स्पष्टपणे दिसणार नाही. रेकॉर्ड्सनुसार फ्रेंच सरकारने 1966 ते 1996 दरम्यान या ठिकाणी अणुचाचण्या केल्या होत्या.

Read in English