'These' birds in nature indication of monsoons
निसर्गातले 'हे' पक्षी देतात पावसाचे पूर्वसंकेत By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 09:46 PM2019-07-05T21:46:11+5:302019-07-05T21:51:16+5:30Join usJoin usNext चातक पक्षी - पावसाळ्याची वर्दी सर्वात पहिल्यांदा चातक पक्षी देतो. पाऊस वेळेत पडणार असल्यास चातक पक्ष्यांचे आगमन अचूक वेळेत होते. चातक पक्ष्याचे आगमन लांबल्यास पाऊसही लांबतो, अशी आख्याचिका सांगितलं जाते. चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या सांकेतिक आवाजात ओरडल्यास समजावं पावसाचे दिवस जवळ आले. पावशा पक्षी - चातक पक्ष्यानुसारच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत पावशा पक्षीसुद्धा देतो. निसर्गातल्या अद्भुत घटनांचा हवाला हा बऱ्याचदा पावशा पक्षी देत असतो. पावशा पक्षी ओरडू लागल्यानंतर शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतात. तित्तीर पक्षी - रानावनात, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको..’ अशा सुरात ओरडतात. हे पक्षी ओरडू लागल्यास पाऊस लवकर येणार असल्याचा अंदाज बांधला जातो. जंगलातल्या माळरानांबरोबरच या पक्ष्यांचे अस्तित्व मानवी वस्त्यांशेजारची आढळून येते. कावळा - कावळ्याने मे महिन्यात बाभुळ, सावर अशा झाडांवर घरटे केल्यास पाऊस कमी पडत असल्याची अख्यायिका आहे. तर आंबा, करंज या वृक्षांवर केल्यास पाऊस चांगला बरसतो असंही सांगितलं जातं. सहसा कावळा झाडाच्या शेंड्यावर घरटे करीत नाही. आणि केल्यास ती अत्यंत दुर्मीळ घटना समजली असते. यातून दुष्काळ येणार असल्याचे अंदाज बांधले जातात. वादळी पक्षी - वादळी पक्षी हे पावसाळ्याच्या पूर्वीच किनाऱ्याच्या दिशेने येतात. त्यामुळे पाऊस पडण्याचे मच्छीमारांना संकेत मिळतात. समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. त्याचा अर्थ हमखास पाऊस पडणार किंवा सुमद्रात वादळ येणार.