these childhood memories will surely make you smile
बालपण देगा देवा; तुम्हालाही वाटतो का लहानपणीच्या 'या' गोष्टींचा हेवा? By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:53 PM2019-02-06T14:53:50+5:302019-02-06T14:59:31+5:30Join usJoin usNext लहानपणीच्या अनेक आठवणी अनेकांच्या मनात आजही ताजा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लंगडीचा हा खेळ. यावरुन अनेकदा भांडणंही व्हायची. अनेकांना च्युईंगम खाणं आवडतं. अनेकांना लहानपणी ही सवय लागली. स्टीकर फ्री मिळतं म्हणून अनेकजण त्यावेळी च्युईंगम खरेदी करायचे. शक्तीमान ही त्यावेळची अतिशय लोकप्रिय मालिका होती. ही मालिका लागली की सर्वजण हातातलं काम टाकून टीव्हीसमोर बसायचे. सापशिडीचा खेळ तर अनेकांना आजही आठवतो. आता मोबाईलमध्येही सापशिडी खेळता येते. मात्र त्यात ती गंमत नाही. आता कितीही महागड्या गोळ्या खा. पण त्याची तुलना या गोळ्यांशी होऊ शकत नाही. कारण या गोळ्यांशी लहानपणीच्या अनेक गोड आठवणी जोडल्या गेल्या आहेत. पेन पेन्सिलसाठी आई बाबांकडे हट्ट केला नाही, अशी व्यक्ती सापडणं अवघडच. जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असणाऱ्यांकडे हा खजिना सापडायचा. दिवाळी आली की अनेकांकडे असे रोल असायचे. काहीजण तर भिंतीवर फासून हा रोल फोडायचे. आता मोबाईलवर अगदी कोणतीही गाणी लावता येतात. मात्र वॉकमॅनची बातच काही और होती. इंक पेनानं अक्षर सुंदर येतं असं म्हटलं जायचं. त्यामुळे अनेकांनी हे पेन घेतलं. मात्र हे पेन झटकलं की शाई उडायची अन् शाळेत विद्यार्थ्यांचे कपडे खराब व्हायचे.