कसा तयार केला होता जगातला पहिला टीव्ही रिमोट? जाणून घ्या तो बनवण्याची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:21 IST2024-12-17T16:02:39+5:302024-12-17T16:21:19+5:30

First TV Remote : तुम्हाला माहीत आहे का की, जगातील पहिलं रिमोट कसं होतं? याचा आविष्कार कसा झाला होता? कदाचित माहीत नसेल. तेच जाणून घेऊया.

First TV Remote : आजकाल टीव्हीसोबत रिमोटही मिळतो. ज्याद्वारे तुम्ही सहजपणे टीव्ही कंट्रोल करू शकता. चॅनल बदलायचं असेल किंवा आवाज कमी-जास्त करायचा असेल अशी वेगवेगळी कामे रिमोटद्वारे केली जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातील पहिलं रिमोट कसं होतं? याचा आविष्कार कसा झाला होता? कदाचित माहीत नसेल. तेच जाणून घेऊया.

भारतात टीव्ही तर अनेक दशकांआधी आला होता. पण तेव्हा टीव्हीसोबत रिमोट येत नव्हता. त्यावेळी लोकांना टीव्हीचं चॅनल बदलण्यासाठी किंवा आवाज कमी-जास्त करण्यासाठी उठून टीव्हीजवळ जावं लागत होतं. यात जास्त वेळ जात होता.

सगळ्यात आधी एक मशीन बनवण्यात आली होती. ज्याच्या मदतीने टीव्हीचं चॅनल बदलता येत होतं. पण त्यासाठी मशीन टीव्हीला जोडावी लागत होती. ही मशीन लोकांना काही आवडली नाही. १९५० च्या दशकात अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रमुख यूजीन एफ मॅक्डॉनल्ड यानी कंपनीच्या इंजिनिअर्सना एक असं यंत्र बनवण्यास सांगितलं ज्याद्वारे बसल्या बसल्या चॅनल बदलता यावं.

यूजीन सांगण्यावरून १९५५ मध्ये जेनिथ कंपनीने एक उपकरण तयार केलं ज्याला 'फ्लॅशमॅटिक' म्हटलं जात होतं. याला रिमोट नाही तर फ्लॅशमॅटिक म्हटलं जात होतं. कारण हे प्रकाशाचा वापर करून टीव्ही कंट्रोल करत होतं. हे यंत्र जेनिथ कंपनीचे इंजिनिअर यूजीन पॉले यांनी बनवलं होतं.

फ्लॅशमॅटिकमध्ये काही बटन होते. जेव्हा एखादी व्यक्ती याचं बटन दाबत होती तेव्हा एक प्रकास निघत होता. जो टीव्हीवरील एका सेन्सरवर पडत होता. अशाप्रकारे टीव्ही कंट्रोल केली जात होती. पण फ्लॅशमॅटिकमध्ये फार कमी बटनं होते. ज्याद्वारे काही गोष्टीच कंट्रोल केल्या जात होत्या.

याचं एक नुकसानही होतं. फ्लॅशमॅटिक प्रकाशाने काम करत होतं. त्यामुळे कधी कधी सूर्याचा प्रकाश टीव्हीवर पडल्याने टीव्ही आपोआप चालू आणि बंद होत होती. सोबतच याची किंमतही खूप जास्त असायची. फ्लॅशमॅटिक खरेदी करण्यासाठी लोक त्यावेळी १०० डॉलर्स खर्च करत होते.