Top Photos From 2019 International Landscape Photographer Of The Year
'भन्नाट' लँडस्केप फोटोग्राफी! By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 03:44 PM2020-03-16T15:44:14+5:302020-03-16T15:56:04+5:30Join usJoin usNext आपल्या पृथ्वीवर अनेक सुंदर ठिकाणे आहेत, पण आपण ती काही-ना-काही कारणांमुळे पाहू शकत नाही. मात्र, तिच ठिकाणे फोटोंच्या माध्यमातून फोटोग्राफर आपल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून देतात. अशाच फोटोग्राफरची जागतिक लँडस्केप फोटोग्राफर स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामधील काही निवडक फोटो... हा फोटो दक्षिण अमेरिकेच्या डच कॅरिबियनमधील बोनायर बेटाचा आहे. फोटोग्राफर सँडर ग्राफ्टने हे मीठाचे पर्वत आपल्या कॅमेर्यावर टिपले. बॅडलँड्स नॅशनल पार्क अमेरिकेच्या ओटा राज्यात पसरले असून सुमारे हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापलेले आहे. याचा फोटो डेव्हिड स्विन्डलर यांनी काढला आहे. कॅनडाच्या अल्बर्टा प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यानंतर कॅनेडियन रॉकीजचे एक सुंदर फोटो दिसत आहे. फोटोग्राफर ग्रेग बोर्टीन यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. फोटोग्राफर स्टॅस बर्ट्निकस यांनी हा फोटो काढला आहे. हा फोटो अलास्कामधील डेनाली नॅशनल पार्कचा आहे. ब्राझीलमध्ये असलेल्या लेनकॉइस मारनहिसंसमधील समुद्रात अंड्युलेटिंग वाळूचे बरेच पर्वत आहेत. फोटोग्राफर इग्नासिओ पलासियोस यांनी हा फोटो काढाला आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स प्रांतातील ब्लू पर्वतमधील लिंकन रॉकचा आहे. फोटोग्राफर बेंजामिन मेज यांनी हा फोटो टिपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेस असलेला पिंक सॉल्ट लेक जगभरातील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. फोटोग्राफर मॅट बीट्सन यांनी या सुंदर लेकचा फोटो काढला आहे. फोम फक्त साबणामध्येच नाही तर बर्फात देखील आहे. बर्फाचे फुगे असलेला हा फोटो रोमेनियाच्या रेटजेट नॅशनल पार्कमध्ये फोटोग्राफर नेजर ओविडीयू यांनी टिपला आहे. फोटोग्राफर वेइयाओ पन यांनी हा फोटो दक्षिण पूर्व अलास्कामध्ये टिपला आहे. यामध्ये आइसबर्गचे सौंदर्य पाहू शकता. हा फोटो अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागातील आहे. फोटोग्राफर थोरस्टे शेहुएरमॅन यांनी आपल्या कॅमेर्यावर कैद केला आहे. टॅग्स :जरा हटकेJara hatke