हृदयद्रावक! ....म्हणून मोठ्या संख्येने प्राण्यांना गमवावं लागलं घर; समोर आले भीषण फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 04:15 PM 2020-11-09T16:15:06+5:30 2020-11-09T16:29:37+5:30
जगभरातील थंड परिसरात राहणारे प्राणी आता निवारा शोधण्यासाठी सर्वत्र संचार करत आहेत. दरम्यान रशियन वैज्ञानिकांनी वॉलरस (Walrus) या प्राण्यांचा शोध घेतला आहे. जे आपल्या मूळ निवासापासून बराचवेळ लांब होते. या कॉलनीमध्ये जवळपास ३ हजार वॉलरस उपस्थित आहेत. वॉलरस प्राणी अनेक कारणांपासून आपल्या मूळ निवासापासून लांब आले आहेत.
रशियन वैज्ञानिकांना दिसून आलं की, ३००० वॉलरस रशियाच्या समुद्र किनारी आणि शांत वातावरणात उपस्थित होते. सध्या त्यांच्या प्रजननाचा कालावधी आहे. साधारणपणे या कार्यासाठी हे प्राणी पोहत समुद्रातील बर्फाच्या तुकड्यापर्यंत पोहोचतात. यावेळी हे प्राणी ६००० किलोमीटर अंतर पार करून आले आहेत.
संशोधक एलेक्जेंडर सोकोलोव यांनी सांगितले की, हा अद्भूत नजारा आहे. प्रजननासाठी हे जीव समुद्रात जातात पण यावेळी समुद्र किनारी आले आहेत. समुद्रात बर्फाचे तुकडे शिल्लक नसल्यामुळे या प्राण्यांच्या जिवितावर प्रश्न उपस्थित होत आहे. या कॉलनीमध्ये नर, मादी यांसोबत पिल्लू सुद्धा आहेत.
एलेक्जेंडर यांनी पुढे सांगितले की, या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी ही स्थिती प्रयोगशाळेप्रमाणेच आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कंजरवेशन ऑफ नेचरने २००६ मध्ये वॉलरस या प्राण्याला लुप्त होत असलेल्या प्रजातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. जगभरातील लोकसंख्या एकूण १२,५०० च्या आसपास आहे.
या प्राण्यांच्या शिकारीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात आली आहे. तरीसुद्धा अनेक ठिकाणी गुप्तपणे शिकार केली जाते. या प्राण्यांच्या दात आणि चामड्याचा अवैध व्यवहार केला जातो.
मॅरीन मॅमल रिसर्च एंड एक्सपेडिशन सेंटरचे वैज्ञानिक आंद्रेई बोल्टूनोव यांनी सांगितले की अटलांटिक वॉलरसची लोकसंख्या वाढत असून वास्तव्यासाठी जागेची कमतरता भासत आहे.
मानवी कृत्यांमुळे थंड प्रदेशातील बर्फ वितळण्याच्या मार्गावर आहे. परिणामी त्यांना इतर ठिकाणी वास्तव्यास जावे लागत आहे. मागच्या काही दशकात आईस फ्री वातावरणाचा काळ वाढत चालला आहे. त्यामुळे वॉलरस प्राण्यांना जीवितासाठी संघर्ष करावा लागत आहे.
वैज्ञानिकांनी वॉलरसचे काही डीएनए घेतले असून कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या वॉलरसना सॅटेलाईट टॅगिंग केलं आहे. जेणेकरून त्यांच्या हालचालींबाबत माहिती घेता येऊ शकते. त्यामुळे वॉलरसच्या व्यवहारांमध्ये होत असलेल्या बदलांचे परिक्षण केले जाऊ शकेल.