काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही..... By manali.bagul | Published: February 28, 2021 05:05 PM 2021-02-28T17:05:09+5:30 2021-02-28T17:39:42+5:30
Trending Viral News in Marathi : आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत एडलियानं लोकांमध्ये जागृती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं मुलींना स्वतःवर प्रेम करायला सांगितले आहे. महिला आणि पुरूषांच्या शरीररचनेत फरक दिसून येतो. वेगवेगळ्या हार्मोन्समुळे शरीराची वेगळी रचना दिसून येते. अनेकदा हार्मोन्समध्ये डिस्बॅलेंस आल्यामुळे माणसााला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक घटना समोर येत आहे. डेनमार्कमधील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय एलडिना जगंजक जेव्हा तरूणावस्थेत आली तेव्हा तिच्यात वेगवेगळे बदल होऊ लागले.
अचानक तिच्या तोंडावर केस यायला सुरूवात झाली. या केसांमुळेच तिचा चेहरा पुरूषांप्रमाणे वाटू लागला. आधी एलडिना लोकांना भेटायला जायची तेव्हा तोंडावरचे संपूर्ण केस काढून टाकायची. मार्च २०२० पासून तिनं असं करणं बंद केलं आहे. एलडिनाने आपल्या मोठ मोठ्या मिश्या आणि आयब्रोजसह फोटो शेअर केला आहे. आता तीला खूप आत्मविश्वास आल्याचं दिसून येत आहे.
एलडिनाने आपल्या तोंडावर येत असलेल्या केसांबाबत मनमोकळेपणानं चर्चा केली आहे. या केसांमुळे लोक अनेकदा तिची खिल्ली उडवतात. पण तिला याचा काहीही फरक पडत नाही.
डेनमार्कची रहिवासी असलेल्या एलडियानं सांगितले की, ''जेव्हा माझा असा चेहरा लोक पाहायचे तेव्हा त्यांना खूप समजवावं लागत होतं. माझ्यावर काहीजण हसायचे म्हणून रोज थ्रेडिंग करावं लागायचं.''
पुढे तिनं सांगितले की, ''मार्च २०२० मध्ये मला जाणवलं की मी कितीही प्रयत्न केला तरी लोकांचे टोमणे बंद होणार नाहीत. यामुळे जेव्हाही मी रस्त्यावर चालते तेव्हा लोक असे पाहतात जसे काही मी एलियन आहे. थ्रेडिंग करणं बंद केल्यानंतर मला खूपच आत्मविश्वास आला. मी माझ्या शरीरावर प्रेम करू लागले. ''
आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करत एडलियानं लोकांमध्ये जागृती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं मुलींना स्वतःवर प्रेम करायला सांगितले आहे. 'जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कमेंट्सची पर्वा कराल तोपर्यंत तुम्हाल न्याय मिळू शकत नाही. ' असंही ती म्हणते. (Image Credit- asianetnews)