Oranges into electricity: खरं की काय? 'इथं' संत्र्यांपासून तयार केली जातेय वीज; जाणून घ्या ही कमी खर्चाची 'सुपर टेक्निक'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 01:09 PM2021-03-03T13:09:58+5:302021-03-03T13:27:22+5:30

Oranges into electricity : . संत्र्यांचा वापर फक्त खाद्यपदार्थ म्हणून नाही तर वीजनिर्मितीसाठीसुद्धा केला जात आहे.

पानी, कोळसा, हवा यांपासून वीज तयार होते. असं तुम्ही ऐकलं असेल. संत्र्यापासून वीज तयार होते असं तुम्ही कधी ऐकलंय का? होय. हे खरं आहे. स्पेनमधील एका शहरात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. संत्र्यांचा वापर फक्त खाद्यपदार्थ म्हणून नाही तर वीजनिर्मितीसाठीसुद्धा केला जात आहे. आज आम्ही तुम्हाला संत्र्यापासून वीजनिर्मिती करतात तरी कशी हे सांगणार आहोत.

स्पेनच्या सवील शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावर संत्र्याचे उत्पादन घेतलं जात आहे. याठिकाणी गुणवत्तापूर्ण संत्र्यांचा वापर करून मार्मालेड, कॉन्ट्रीयू आणि ग्रांड मरिनर यांसारखी पेय तयार केली जात आहेत. या ठिकाणची संत्री आपला एसिडिक फ्लेवर, सुगंध आणि ताजेपणासाठी प्रसिद्ध आहेत. इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणावर वीज तयार करण्यासाठीसुद्धा संत्र्यांचा वापर केला जात आहे.

सवील शहरातील म्यूनिसिपल वॉटर कंपनी एमासेसानं काही दिवसांपूर्वी प्रस्ताव ठेवला होता की, जी संत्री खराब होतात. त्याच्यापासून वीजनिर्मिर्ती करता येऊ शकते.

उरलेल्या संत्र्याचे खाद्य तयार केले जाऊ शकते. रस्त्यावर पडलेले, फेकलेले आणि शेतात पडलेल्या ३५ टन खराब संत्र्यांपासून वीज तयार केली जाऊ शकते.

रस काढल्यानंतर EDAR Copero Wastewater Treatment Plant मध्ये पाठवलं जाणार आहे. त्यानंतर बायोफ्लूल म्हणजेच जैविक इंथन तयार करून त्यापासून वीज निर्मिती करण्यात येईल. संत्र्याच्या रसापासून १५०० kWH वीज तयार होऊ शकते. याद्वारे १५० घरांमध्ये वीज पुरवली जाऊ शकते. यासाठी सवील शहराच्या प्रशासनाला २.५० लाख युरोंची म्हणजेच २२.१२ लाखांची गुंतवणूक करावी लागेल. उदाहरणासाठी एकदा खराब संत्र्यांपासून वीज तयार करण्यात आली आहे.

सवीलमध्ये मेयर जुआन एस्पाडास सेजस यांनी या प्रोजेक्टची सुरूवात करताना त्यांनी सांगितले की, स्पेनमध्ये इमासेसाला एक रोल मॉडेलप्रमाणे पाहिलं जात आहे. कारण कंपनी वातावरणातील बदलांपासून लोकांना वाचवत आहे. यामुळे वीज आणि खत तयार करण्यास मदत होईल. हा एक अनोखा प्रकल्प आहे.

स्पेनमध्ये २०१८ साली ही योजना तयार करण्यात आली होती. २०५० पर्यंत संपूर्ण देशातील वीज रिन्यूएबल एनर्जीत बदलेल. जेणेकरून पूर्ण अर्थव्यवस्थेतील कार्बन फुटप्रिंट्सला कमी करता येऊ शकतं, असा त्यांचा उद्देश होता.

याचवर्षी फेब्रुवारीत कंपनी ब्लूशिफ्टनं बायोफ्लूपासून उडणार रॉकेट स्टारडस्ट तयार केलं होतं. याची यशस्वीरित्या चाचणीसुद्धा करण्यात आली होती. स्टारडस्ट रॉकेट या इंधनासह १२१९ मीटर उंचावर गेले. याचे वजन २५० किलोग्राम असून हे अंतराळाच्या उड्डानाचं सगळ्यात स्वस्त माध्यम बनू शकतं.