अजबच! इथे वधू घेऊन येते वरात, वरपक्ष देतो हुंडा, पाठवणीची प्रथा आहे आणखीनच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 11:59 IST2025-02-02T11:53:52+5:302025-02-02T11:59:54+5:30

Tribal Unique Wedding: जगभरात विवाहाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा असल्याते दिसून येते. भारतात सर्वसाधारणपणे वर वरात घेऊन येतो आणि वधूला घेऊन जातो. वराला भेट म्हणून हुंडाही दिला जातो. मात्र भारतातीलच झारखंड राज्यातील आदिवासी समाजामध्ये नेमकी उलट परंपरा आहे. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील ‘हो’ आदिवासी समाजामध्ये वधू वरात घेऊन येते आणि वरपक्षाकडून हुंडाही घेते.

जगभरात विवाहाच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा असल्याते दिसून येते. भारतात सर्वसाधारणपणे वर वरात घेऊन येतो आणि वधूला घेऊन जातो. वराला भेट म्हणून हुंडाही दिला जातो. मात्र भारतातीलच झारखंड राज्यातील आदिवासी समाजामध्ये नेमकी उलट परंपरा आहे. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील ‘हो’ आदिवासी समाजामध्ये वधू वरात घेऊन येते आणि वरपक्षाकडून हुंडाही घेते.

‘हो’ आदिवासी समाजातील एका व्यक्तीने याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्याकडे वर नाही तर वधूला हुंडा दिला जातो. वर वरात घेऊन येत नाही, तर वधू वरात घेऊन येते.

खुंटी येथील ‘हो’ या आदिवासी समाजामध्ये अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. खास बाब म्हणजे हो समाजामधील विवाहामध्ये वधूपक्षाला हुंडा द्यावा लागत नाही.

उलट वर पक्ष हा वधूच्या कुटुंबाला एक बैलजोडी, गाय आणि रोख रक्कम देतात. एवढा हुंडा देणं अनिवार्य असतं. त्याशिवाय वर पक्षा त्यांच्या इच्छेने आणखी काही देऊ इच्छित असेल तर देऊ शकतो.

‘हो’ आदिवासी समाजामधील विवाहात वधू वरात घेऊन येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वरात माघारी जाते. तर वधू आपल्या पतीच्या घरी राहते. पाठवणीची ही परंपरा खूप खास अशी आहे.

‘हो’ आदिवासी समाजातील आंदी म्हणजेच विवाहामध्ये वर पक्ष वधू पक्षाला काही रक्कम देतो. इथे वर पक्षाकडून वधू पक्षाला कन्याधन देण्याची परंपरा आहे.

या प्रथेला गोनोंग असं संबोधलं जातं. यामध्ये अनिवार्यपणे एक बैल जोडी आणि १०१ रुपये रोख देण्याबरोबरच काही ठिकाणी एक गायही दिली जाते.

‘हो’ आदिवासी समाजातील जाणकार सांगतात की, आमच्या पूर्वजांनी सांगितल्यानुसार आमच्या समाजात मुलांपेक्षा मुलींना मान दिला जातो. समाजामध्ये मुलींना प्राधान्य दिलं जातं.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही मुली किंवा महिलांचं देवीच्या रूपात पूजन करतो. त्या जीवनदात्या आहेत. आमच्या समाजामध्ये महिलांचं स्थान हे उच्च दर्जाचं आहे. त्यामुळेच ही परंपरा ही महिलांना मान देण्यासाठी सुरू झाली असावी.