तूतनखामेन : इजिप्तचा असा राजा ज्याच्या कबरेला स्पर्श करणाऱ्या सर्वांचा झाला होता मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 04:17 PM 2021-09-04T16:17:18+5:30 2021-09-04T16:23:50+5:30
प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे. इजिप्तचा पिरॅमिड आणि ममी नेहमीच जगातील लोकांसाठी आश्चर्याचा विषय राहिले आहेत. याबाबत अनेक किस्से आणि कथा ऐकायला मिळतात. अनेकदा तर अनेक आश्चर्यकारक खुलासे होत राहतात. तेव्हा अनेक रहस्य समोर येतात. येथील अनेक किस्स्यांवर आणि कथांवर सिनेमेही बनले आहेत. या सिनेमांमधून इजिप्तचा इतिहास खोलवर दाखवण्यात आला होता.
तूतनखामुन १३३३ ईसपूर्व ते १३२४ ईसपूर्वपर्यंत इजिप्तचा राजा होता. तूतनखामुनला इजिप्तच्या इजिप्टोलॉजिकल भाषेत तूतनखामेन असंही म्हटलं जातं. तूतनखामेन केवळ १० वय असताना इजिप्तचा राजा झाला होता. तो प्राचीन इजिप्तच्या १८व्या राजवंशातील ११ वा राजा होता. तो केवळ १८ वर्षांचा असताना त्याचा मृत्यू झाला होता.
तूतनखामेनच्या मृत्यूबाबत आणि त्याच्या कबरीबाबत इजिप्तच्या इतिहासात अनेक कथा प्रचलित आहेत. खासकरून इतिहासकारांमध्ये त्याच्या मृत्यूबाबत वेगवेगळी मतं आहेत. इतिहासकारांचं मत आहे की, तूतनखामेनची हत्या झाली होती. तर इजिप्तमधील लोक म्हणतात की, तो शिकारी दरम्यान जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तूतनखामेनचा मृत्यूच नाही तर त्याच्या कबरीबाबतही अनेक रहस्य प्रचलित आहेत.
तूतनखामेनला जिवंत असताना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी मृत्यूनंतर मिळाली. तूतनखामेनची चर्चा जास्त या कारणाने होती की, त्याची कबर ३ हजार वर्षानंतरही चांगल्या स्थितीत सापडली होती. असं सांगितलं जातं की, तूतनखामेनची कबर वैज्ञानिकांनी शेकडो वर्षानंतर चांगल्या स्थितीत शोधून काढली होती. या शोधाला बरीच वर्ष लागली होती. कारण तूतनखामेनचा मकबरा एका दुसऱ्या मकबऱ्या खाली लपवण्यात आला होता.
तूतनखामेनची कबर खोदणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. याला 'व्हॅली ऑफ किंग्स'चा शोध असंही म्हटलं जातं. ही कबर शोधणाऱ्या जवळपास सर्वच वैज्ञानिकांचा आणि कामगारांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. इतकंच काय तर या मिशनवर पैसे लावणारे ब्रिटिश उद्योगपती लॉर्ड कॉर्नर वॉनचा डास चावल्याने मृत्यू झाला होता.
प्राचीन इजिप्तमधील लोकांचं मत आहे की, या सर्व रहस्यमय घटना तूतनखामेनची कबर छेडल्यामुळे घडल्या होत्या. जो कुणी तूतनखामेनच्या कबरेला स्पर्श करेल त्याचा मृत्यू निश्चित आहे.
१९९२ मध्ये ब्रिटिश पुरातत्ववादी होवार्ड कार्टरने त्याच्या मकबऱ्याचा शोध लावला होता. या शोधादरम्यान तूतनखामेनच्या ममीमधून समजलं होतं की, मृत्यूवेळी त्याचं वय केवळ १८ वर्षे होतं. कार्टरने आपल्या रिसर्चमध्ये लिहिलं होतं की, 'जेव्हा मी पहिल्यांदा तूतनखामेनची कबर पाहिली, तेव्हा ममीने ताबीज घातलं होतं आणि चेहऱ्यावर सोन्याचा मास्क लावला होता.
तूतनखामेनच्या कबरेबाबत नुकताच एक नवा शोध समोर आला आहे. यादरम्यान रिसर्चमधून समोर आलं की, तूतनखामेनच्या गुप्त मकबऱ्यात कोणतीही गुप्त खोली नव्हती. पण याआधी करण्यात आलेल्या सर्व शोधात मकबऱ्यात एक गुप्त खोली असल्याचा दावा करण्यात आला होता.