twin sisters marry twin brothers
...अन् जुळ्यांचं जुळलं! जुळ्या बहिणींचा जुळ्या भावांशी विवाह By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 12:02 AM2018-08-11T00:02:40+5:302018-08-11T00:06:31+5:30Join usJoin usNext ओहियोत राहणाऱ्या ३२ वर्षांच्या ब्रिटनी आणि ब्रायना या जुळ्या बहिणींनी जॉश आणि जेरेमी नावाच्या जुळ्या भावांसोबत लग्न केलं आहे. जुळ्या बहिणी असल्यानं जुळ्या भावांसोबत लग्न करायचं, असं ब्रिटनी आणि ब्रायनाचं स्वप्न होतं. त्यांचं हे स्वप्न अखेर पूर्ण झालं. आयुष्यात घडलेली ही घटना अगदी परीकथेप्रमाणे असल्याचं दोघींनी सांगितलं. आम्हाला जुळ्या भावांसोबत लग्न करायचं होतं. मात्र हे प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमीच आहे, असं आम्हाला वाटू लागलं, असं दोघींनी सांगितलं. गेल्या शनिवारी 2018 Twins Days Festival मध्ये ब्रिटनी आणि ब्रायनानं जॉश आणि जेरेमी नावाच्या जुळ्या भावांसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे जॉश आणि जेरेमी यांनासुद्धा जुळ्या मुलींशी लग्न करण्याची इच्छा होती. अखेर त्यांचीही इच्छा पूर्ण झाली. टॅग्स :लग्नजरा हटकेmarriageJara hatke