नशीब ! जे कुत्रे मरण्यासाठी सोडून दिले गेले होते, ते आज जगाचा प्रवास करत आहेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:30 PM2021-03-31T15:30:26+5:302021-03-31T15:38:53+5:30

Finn आणि Yuri अशी या कुत्र्यांची नावे आहेत. ते सध्या त्यांना वाचवणाऱ्या महिलेसोबत प्रवास करत आहेत. ते यूरोप फिरत आहेत.

कधी कुणाचं नशीब कसं बदलेल हे कुणी सांगू शकत नाही. दोन कुत्र्यांचं असंच झालं. त्यांना कुणीतरी रस्त्यावर सोडून गेलं होतं. ते जगण्यासाठी संघर्ष करत होते. तेव्हाच त्यांना रोमानियाच्या एका महिलेने रेक्स्यू केलं. तिने त्यांची काळजी घेतली. आता ते दोन्ही कुत्रे तिच्यासोबत जग फिरायला निघाले आहेत.

Finn आणि Yuri अशी या कुत्र्यांची नावे आहेत. ते सध्या त्यांना वाचवणाऱ्या महिलेसोबत प्रवास करत आहेत. ते यूरोप फिरत आहेत.

Anne Geier ही एक फोटोग्राफर आहे. तिने फिन आणि यूरीला दत्तक घेतलंय. या दोन्ही कुत्र्यांना किलिंग शेल्टरमद्ये टाकलं जाणार होतं. पण एनीने त्यांचा जीव वाचवला.

सध्या दोन्ही कुत्रे एनीसोबत फिरत आहेत. ते नॉर्वेच्या डोंगरात फिरत आहेत. एनीने त्यांचे झक्कास फोटोही काढले आहेत. २०१४ मध्ये एनीने फिनला दत्तक घेतलं होतं तर २०१७ मध्ये यूरीला.

मीडिया रिपोर्टनुसार, एनी पाळीव प्राण्यांचे फोटो काढते. ऑस्ट्रियाची राहणारी एनी सांगते की, तीन वर्षाआधी तिने आणि तिच्या बॉयफ्रेन्डने ठेरवलं होतं की, ते सगळे मिळून जगाच्या प्रवासावर निघतील.

तिने सांगितले की, त्यांनी आधी VW T4 व्हॅन खरेदी केली. त्यानंतर आपला जगाचा प्रवास सुरू केला. फिन आणि यूरी यात त्यांच्यासोबत आहेत.