Two children wrote 2100 page ramayana during corona virus lockdown jalore rajasthan
वाह, शाब्बास! लॉकडाऊनच्या काळात दोन भावंडांनी लिहिले २१०० पानांचे रामायण By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 11:48 AM2021-01-10T11:48:37+5:302021-01-10T12:14:16+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आलं होतं. त्यामुळे सगळ्याच लोकांना आपापल्या घरी राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. या काळात भारतातील सर्वाधिक लोकांनी दूरर्शनवर प्रसारित केलं जाणारं रामायण आणि महाभारत पाहायला सुरूवात केली होती. तुम्हाला कल्पनाही नसेल पण एका कुटुंबातील दोन बहिण भावांनी रामायण पाहता पाहता २१०० पानांचे संपूर्ण रामायण लिहिले आहे. राजस्थानातील जालैरमधील तिसरी आणि चौथीच्या वर्गात शिकत असलेला माधव जोशी आणि त्याची बहिण अर्चना जोशी या दोन भावंडांनी लॉकडाऊनदरम्यान २१०० पेक्षा अधिक पानांचे रामायण लिहिले आहे. माधव आणि अर्चना या भावंडानी कागदांवर पेनाने संपूर्ण रामायण लिहिले आहे. यासाठी २० वह्यांची गरज भासली. या वह्यांचा वापर केल्यानंतर २१०० पेक्षा पानांवर रामायण लिहिले गेले. दोन्ही मुलांनी सात भागात रामायण लिहून पूर्ण केलं आहे. श्री रामचरित्रमानस सात भागात आहे. माधव आणि अर्चना यांनी या सात भागात बाल्यावस्था, अयोध्या ,अरण्य, किष्किंधा , सुंदर, लंका आणि उत्तर रामायण यांचा समावेश आहे. यात माधवाने १४ भागात बाल्यावस्था, आयोध्या, अरण्य आणि उत्तरकांड लिहिले आहे. तर लहान बहिण अर्चनाने ६ भागात किष्किंधा, सुंदर आणि लंकेबाबत लिहिले आहे. माधवने सांगितले की, कोरोनाकाळात दुरदर्शनमध्ये प्रसारीत केलं जाणारं रामायण पाहून रामायण वाचण्याची इच्छा आणखी वाढली. कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र श्रीरामचरितमानसचे तीनवेळा पठण केले. यावेळी वडील संदीप जोशी यांनी प्रोत्साहन दिल्यानंतर रामायण लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाली. ही दोन्ही मुलं जालौरच्या आदर्श विद्यामंदिरमध्ये शिकतात. अर्चना तिसरीला असून माधव चौथीला आहे. त्यांना आता दोघांना रामचरित्रमानस, दोहे, सगळे पाठ झाले आहेत.(Image Credit- Aajtak)Read in Englishटॅग्स :जरा हटकेरामायणJara hatkeramayan