Un Engagement Photoshoot: प्रियकराने धोका दिला, संतप्त तरुणीने कडक फोटोशूट करत साखरपुडा मोडला By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:11 PM 2021-10-14T14:11:09+5:30 2021-10-14T14:14:15+5:30
Un Engagement Photoshoot: मेरेडिथ मेटाच्या लग्नासाठी थोडाच वेळ उरला होता. सप्टेंबर २०२० मध्ये तिचा साखरपुडा झाला होता. लग्नाला काही दिवस उरले असताना होणारा नवरा फसवत असल्याचे तिच्या लक्षात आले. तेव्हा या तरुणीने साखरपुडा मोडल्याचे जाहीर करण्यासाठी असे पाऊल उचलले की त्याबाबत जाणून घेऊन तुम्ही तिचे कौतुक केल्याविना राहणार नाही. चार वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर एका जोडप्याने साखरपुडा केला होता. मात्र लग्नाला काही दिवस उरले असताना होणारा नवरा फसवत असल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. तेव्हा या तरुणीने साखरपुडा मोडल्याचे जाहीर करण्यासाठी असे पाऊल उचलले की त्याबाबत जाणून घेऊन तुम्ही तिचे कौतुक केल्याविना राहणार नाही.
२७ वर्षांची मेरेडिथ मेटा अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये राहते. ४ वर्षांपासून मेटा तिच्या बॉयफ्रेंडसोबतच होती. तसेच सप्टेंबर २०२० मध्ये तिचा साखरपुडाही झाला होता. मात्र तिचा बॉयफ्रेंड तिला फसवत आहे, हे तिला जेव्हा समजले तेव्हा तिने स्वत:च हे नाते मोडण्याचा निर्णय घेतला.
खास बाब म्हणजे मेटाने जिथे तिच्या साखरपुड्याचे फोटो काढले होते. तिथेच तिने साखरपुडा मोडल्याचे ग्लॅमरस फोटोशूट केले. फोटोशूटची जागा तीच होती. केवळ फरक होता तो म्हणजे यावेळी तिने पांढऱ्या कपड्यांपैकी काळ्या रंगाचे कपडे घातले होते.
तिने Un Engagement Photoshoot या नावाने या फोटोशूटला ब्रँड केले होते. मेटाने ब्लॅक ड्रेसमध्ये सजून आपला एंगेजमेंट ड्रेस टांगला आणि तो काळ्या रंगाने रंगवून टाकला. पेशाने डेंटल हायजिनिस्ट असलेल्या मेटाने या दु:खद परिस्थितीमध्ये याला सशक्तीकरणाचे नाव दिले आहे.
तिने दु:खामध्येही स्वत:ला सजण्या-सवरण्याची हिंमत दाखवली. तसेच दु:खी होण्याऐवजी स्वत:ला सेलिब्रेट केले. ती सांगते की, तिने यापूर्वी डिव्होर्स पार्टी पाहिली होती. मात्र ती स्वत: असे काही करेल, असा विचार तिने केला नव्हता.
तिने कधी मोठी स्वप्ने पाहत खरेदी केलेला लाखो रुपयांचा ड्रेस झाडावर टांगून काळ्या पेंटने रंगवला. तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर रिविलिंग ड्रेस आवडत नसे. त्यामुळे तिने साखरपुडा मोडण्याच्या फोटोशूटमध्ये रिविलिंग ब्लॅक कलरचा ड्रेस निवडला.
तिच्यासाठी हे सर्व सोपे नव्हते. तिने तिच्या विवाहासाठी खूप स्वप्ने पाहिली होती. त्याची तयारीही तिने सुरू केली होती. मात्र ज्याचा आपण विचार करतो तसं होत नाही. साखरपुडा मोडल्याच्या सोहळ्यामध्ये एक केकसुद्धा कापला. त्यावर लग्नाची तारीख लिहिली होती. मात्र आता हे लग्न होणार नाही असे लिहिले होते.