कमालच! समुद्राखाली मनुष्यांसाठी घरे बनवत आहे 'ही' कंपनी, बघा कसे असतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:00 PM2024-09-19T15:00:58+5:302024-09-19T15:44:08+5:30

Underwater House : आता कंपनीचं मिशन आहे की, मनुष्यांसाठी समुद्रात घरे बनवावी. योजनेनुसार कंपनी एक अंडरवॉटर हॅबिटेट बनवणार आहे.

Underwater Home For Humans: यूनायटेड किंगडममधील एक कंपनी DEEP मनुष्यांसाठी समुद्रात घरे बनवत आहे. कंपनीने २०२२ मध्ये ब्रिस्टलजवळ एक स्कूबा डायविंग सेंटर खरेदी केलं होतं.

आता कंपनीचं मिशन आहे की, मनुष्यांसाठी समुद्रात घरे बनवावी. योजनेनुसार कंपनी एक अंडरवॉटर हॅबिटेट बनवणार आहे. सेंटिनेल सिस्टीम नावाचं हे हॅबिटेट लोकांना समुद्राखाली २०० मीटरवर एक महिने राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी सक्षम बनवेल.

DEEP चं हे सेंटिनेल सिस्टम एकमेकांना कनेक्टेड मॉड्यूल आहे. याचा वापर समुद्राखाली डेटा जमा करण्यापासून ऐतिहासिक जहाज बाहेर काढण्यासाठीही केला जाऊ शकतो. हे हॅबिटेट वेगवेगळ्या आकारामध्ये उभं करता येऊ शकतं. इतकंच नाही तर याचा आकारही वाढवता येऊ शकतो. कंपनीनुसार, याला ६ ते ५० लोक राहून शकतील अशा स्टेशनमध्ये बदलता येऊ शकतं.

गेल्या आठवड्यात कंपनीने वॅनगार्ड नावाने एक छोट अंडरवॉटर हॅबिटेट लॉन्च केलं आहे. हे सेंटिनेलची सिस्टीम विकसित करण्यासाठी वापरलं जाईल, सोबतच कंपनी याला विकेल सुद्धा. १२ मीटर लांब आणि ७.५ मीटर रूंद वॅनगार्डमध्ये लोक तीन आठवडे पाण्यात राहू शकतात. २०२५ मध्ये हे काम पूर्ण होईल.

कंपनीला आशा आहे की, त्यांच्या हॅबिटेटने समुद्राखाली अंतराळात असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसारखी सिस्टीम बनवली जाईल. म्हणजे अंतराळाप्रमाणेच समुद्रातही मनुष्य नेहमीसाठी राहू शकतील.

जगात सध्या अशीच एक लॅब आहे जी समुद्राखाली काम करते. ही लॅब फ्लोरिडा इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटी चालवते. जर सगळं काही सुरळीत झालं तर सेंटिनेल २०२७ पर्यंत तयार होईल. सेंटिनेलचे मॉड्यूल सहा रोबोटद्वारे ३डी प्रिंट केले जातील. हे तयार करण्यासाठी इनकोनेल नावाचं निकेल आधारित सुपरलॉयने एनफोर्स्ड स्टीलचा वापर केला जाईल.